पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएमएल  आता बस सेवेबरोबरच कॅब सर्व्हिस देखील सुरू करणार आहे. इतकंच नाही तर PMPL ची सेवा अधिकाधिक स्मार्ट आणि पर्यावरण पूरक बनवण्याच्या दृष्टिकोनातून ई बसेसची संख्या वाढवणे, पब्लिक चार्जिंग स्टेशन्स उभारणे, तिकीट बुकिंग साठी मोबाईल अॅप विकसित करणे अशा अनेक गोष्टी येत्या काही काळात केल्या जाणार आहे.  पीएमपीएलच्या ताफ्यात गेल्या काही दिवसांपूर्वी ई-बस देखील दाखल झाल्या होत्या.


पुणे आणि पिंपरी -चिंचवडमध्ये विशिष्ट अंतरासाठी प्रवाशांना ई-कॅब सेवा देण्याचे पीएमपीचे नियोजन आहे. ही सेवा 24 तास सुरू राहणार आहे. यासाठी 30 टक्के महिला चालक असणार आहे.  पहिल्या टप्प्यात 100 ते 200 मोटारी पीएमपीच्या ताफ्यात दाखल आहे. सार्वजनिक क्षेत्रातील परिवहन सेवेच्या माध्यमातून ई-कॅबद्वारे प्रवाशांना सेवा देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. विमानतळ, एसटी, रेल्वे स्थानक तसेच बाजारपेठेत जाण्यासाठी या कॅब प्रवाशांना उपलब्ध असतील, अशी माहिती मिळत आहेत.



  •  PMPL ची ई कॅब उबर, ओलाला देणार टक्कर

  • सात  ठिकाणी पब्लिक चार्जिंग स्टेशन्स उभारणार

  • 500 नवीन इ बसेस ताफ्यात दाखल होणार

  • ॲपवर बस, कॅबचे  वेळापत्रक कळणार आहे

  • ॲपवर  तिकीट काढता येणार


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha