Nana Patole leaves for Delhi : विधान सभेचा नवीन अध्यक्ष कोण? याचे उत्तर घ्यायला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज दिल्लीत असल्याचं कळतंय. मात्र कॅबिनेटमध्ये नसणारा काँग्रेस नेत्यापेक्षा कॅबिनेट मधील एखाद्या ज्येष्ठ नेत्याला अध्यक्षपद मिळण्याची शक्यता जास्त असल्याचं कळतंय.  त्याच बरोबर येत्या काळात कॅबिनेटमध्ये काही बदल होण्याची ही शक्यता आहे. 


नाना पटोले हे विधानसभेचे अध्यक्ष होते. ही जागा काँग्रेसच्या कोट्यात होती, मात्र नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर अध्यक्षपद हे रिकामा झाले. काँग्रेसला आता तिथं नवीन व्यक्तीची नेमणूक करायची आहे आणि ही नेमणूक ज्येष्ठ मंत्र्यांपैकी एकाची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच बरोबर अध्यक्ष नीवडीची पद्धतही बदलल्या जाणार आहे. विधान परिषदेच्या सारखंच विधानसभेतही हात वर करून निवड होण्याचा बद्दल करण्यात येणार आहे. सध्या गुप्त मतदानने  निवड होतेय. 


एक महत्त्वाची राजकीय घडामोड म्हणजे राज्याच्या मंत्री मंडळात बदल हिवाळी अधिवेशनानंतर जानेवारी महिन्यात अपेक्षित आहे.  मध्यंतरी नाना नाना पटोले यांना राज्याच्या कॅबिनेटमध्ये ही स्थान मिळणार याचे काही प्रयत्न होते, मात्र एक मोठी जबाबदारी खांद्यावर असताना एका संपूर्ण खात्याची ही जबाबदारी त्यांना मिळेल का ही शंका आहे. येत्या काळात कॅबिनेटमध्ये जो रिशफल अपेक्षित आहे. त्यात शिवसेनेला संजय राठोड यांची जागा भरायची आहे, राष्ट्रवादी काँग्रेसला अनिल देशमुख यांची जागा भरायची आहे, तर काँग्रेसला सुद्धा जो मंत्री अध्यक्ष बनेल त्याची जागा भरायची असेल. त्याचबरोबर इतरही काही बदल अपेक्षित आहेत. मंत्रिमंडळविस्तारात काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये बदल होण्याची शक्यता जास्त असल्याचे कळते. 


बुधवारपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन; सत्ताधारी आणि विरोधकांची खलबतं
बुधवारपासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होतं आहे. यावेळचं अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजणार हे नक्की आहे. ओबीसी आरक्षण, पेपरफुटी, परीक्षेतला विलंब, मराठा आरक्षण, शेतकरी प्रश्न अशा विविध मुद्द्यांवर या अधिवेशनात जोरदार गदारोळ होण्याची शक्यता आहे. आघाडी सरकारच्या कारभारावरून आणि नेत्यांवरच्या आरोपांवरून विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची चिन्हं आहेत. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकही या अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांची दुपारी बैठक आहे. यात अधिवेशनातल्या रणनीतीवर खलबतं होणार असल्याची माहिती मिळत आहे.