Uddhav Thackeray VS Eknath Shinde: केंद्रीय निवडणूक आयोगासमोर (Central Election Commission) आजपासून शिंदे गट (Thackeray Group) आणि ठाकरे गट (Shinde Group ) यांच्यामध्ये धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाचं, यासह अन्य मुद्द्यांवर सुनावणी झाली. मात्र आजची सुनावणी काही मिनिटेच चालली. तर यासंदर्भातील पुढील सुनावणी ही नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार असल्याचं, केंद्रीय निवडणूक आयोगाने Central Election Commission सांगितल्याचं ठाकरे गटाचे (Thackeray Group) नेते अनिल देसाई (Anil Desai) यांनी सांगितलं आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अनिल देसाई (Anil Desai) म्हणाले आहेत की, धनुष्यबाण चिन्हासह इतर मुद्द्यावर जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार. या मुद्द्यांवर आज युक्तिवाद होऊ शकला नाही. ते म्हणाले, आज फक्त 5 ते 7 मिनिटेच कामकाज झालं. आम्हाला अपेक्षित होत की, आम्ही ज्या गोष्टी सादर केल्या आहेत. जे मूळ दस्तावेज दिले आहेत, त्या दस्तावेजाची छाननी झाली पाहिजे होती. त्यात खरं काय, खोटं काय, हे दोन्ही बाजूचे तपासायला हवं होतं. त्यानंतर ते निवडणूक आयोगासमोर जाणार. परंतु जानेवारीच्या पहिल्या आठवड्याची तारीख दिल्याने आम्ही तयार आहोत, असं ते म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, आमच्याकडे 3 लाख प्रतिज्ञापत्र पात्र आणि इतर प्राथमिक सदस्यांची नोंद आम्ही दिली आहे. यातच आतापर्यंत या दोन्ही गटाकडून काय दवे करण्यात आले आहे, हे जाणून घेऊ.
ठाकरे गट (Thackeray Group)
- ठाकरे गट राष्ट्रीय प्रतिनिधी : 160
- संघटनात्मक : 2,82,975
- ठाकरे गट प्राथमिक सदस्य : 19, 41, 815
- एकूण सदस्य : 22, 24, 950
शिंदे गट (Shinde Group )
- खासदार : 12
- आमदार : 40
- संघटनात्मक : 711
- शिंदे गट स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी : 2046
- शिंदे गट प्राथमिक सदस्य : 4, 48, 318
- एकूण : 4, 51,127
इतर महत्वाच्या बातम्या: