Dhananjay Munde-Pankaja Munde : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी त्यांचे बंधू धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं औक्षण केलं. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा यांनी धनंजय मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. "आनंदाचा डोह असो किंवा दुःखाचा सागर, बहीण-भावाचे नाते कायमच अबाधित आहे," अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. धनंजय मुंडे यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. 






धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे यांचं स्वागत केलं होतं. त्यातच धनंजय हे काल (6 जुलै) पंकजा मुंडे यांच्या वरळीतील निवासस्थानी पोहोचले. यावेळी पंकजा मुंडेंनी त्यांचं औक्षण केलं. शिवाय एकमेकांना पेढा भरवून तोंड गोड केलं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीकाटिप्पणी करणारे, तोंडसुख घेणारे भाऊ-बहिण या निमित्ताने एकमेकांशी गळाभेट करताना दिसले.


दोघांच्या भेटीची चर्चा


धनंजय मुंडे यांनी 2012 मध्ये काका गोपीनाथ मुंडे यांच्यापासून वेगळे झाले. त्यांनी अजित पवारांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते आधी विधानपरिषदेत गेले. मग विरोधी पक्षनेता आणि मंत्री अशा जबाबदाऱ्या दिल्या. दुसरीकडे पंकजा यांना मात्र भाजपमध्येच संघर्ष करावा लागला. पंकजा मुंडे यांचा 2014 मध्ये परळीतून विजय झाला होता. तर 2019 मध्ये धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. गोपीनाथ मुंडे यांच्याशी फारकत घेतल्यानंतर धनंजय आणि पंकजा एकमेकांवर तोंडसुख घेण्याची संधी सोडत नव्हते. मात्र आता वरळीतील दोघांच्या भेटीची चर्चा रंगू लागली आहे.


पंकजा मुंडे यांची पत्रकार परिषद


दरम्यान या सगळ्या घडामोडींनंतर पंकजा मुंडे आज दुपारी साडेबारा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यांच्या मुंबईतील वरळी इथल्या कार्यालयात ही पत्रकार परिषद होईल. या बैठकीत पंकजा मुंडे या काय बोलणार याकडे लक्ष लागलं आहे.


VIDEO : Dhananjay Munde Meet Pankaja Munde : मंत्रिपदाची शपथ, शुभेच्छा, गळाभेट; बहिणीकडून भावाचं औक्षण



हेही वाचा


Dhananjay Munde Vs Pankaja Munde: धनंजय मुंडे की, पंकजा मुंडे; 2024 मध्ये कोणाला मिळणार उमेदवारी? परळीच्या राजकारणात नवा ट्विस्ट