Maharashtra Politics : 'अबकी बार 400 पार' चा नारा देत भाजप लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) वतीने प्रत्येक नेत्याला त्याच्या जबाबदारीवर दिलेल्या दोन बूथवर 51% मतांचा टार्गेट देण्यात आले आहे. त्याकरिता भाजपमधील अनेक दिग्गज नेते देखील प्रत्यक्ष मैदानात उतरल्याचे बघायला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule), पंकजा मुंडे अशा सर्व मोठ्या नेत्यांसह पक्षातील प्रत्येक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याला दोन बूथ देण्यात आले असून त्या दोन बूथ वर पक्षाला 51% मत मिळालीच पाहिजे, असे बंधन घालण्यात आले आहे. 


प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना बुथवर 51 टक्के मतांचे टार्गेट


या अनुषंगाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्यातील कामठी विधानसभा क्षेत्रांतर्गत 28 आणि 29 क्रमांकाच्या बूथवर बैठक घेत आहेत. हे दोन्ही बूथ बावनकुळेंच्या जबाबदारीवर देण्यात आले असून या बूथमधून 51% मतं आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक प्रमुख नेत्यांसह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना त्याच्या जबाबदारीवर देण्यात आलेल्या दोन्ही बूथ वरून पक्षासाठी महायुतीच्या उमेदवारासाठी 51% मत मिळवायची आहेत. तसेच जो नेता किंवा पदाधिकारी त्याच्या बूथवर 51% मत घेण्यास अपयशी ठरेल त्या संदर्भात लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाला विचार करावा करावा लागेल, अशी तंबी देखील पक्षाचा वतीने देण्यात आल्याचे बोलले जात आहे. परिणामी, पुढे त्या पदाधिकारी किंवा नेत्याला कुठली उमेदवारी किंवा पद द्यायची की नाही, याचाही आम्ही विचार करू अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे.


बुथस्तरीय कार्ययोजना तयार


आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने पक्ष बांधणीवर अधिक भर दिला आहे. त्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या अनेक बूथच्या वेगवेगळ्या कमिटीजच्या संपूर्ण कामाचा आढावा घेण्यात येत आहे. याकरिता भाजपमधील अनेक नेत्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून तयारी करतांना बघायला मिळात आहे. याविषयी अधिक बोलातान भजाप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पक्षाने 28 आणि 29 बूथची जबाबदारी मला दिली असून सुपर वॉरियर्स प्रमाणे मी काम करत आहे. या बुथवर 51% पेक्षा जास्त मतदान मिळवण्यासाठी आम्ही बूथस्तरीय कार्ययोजना तयार केली असून ही कार्ययोजना 24 विषयांना धरून आहे. त्या अनुषंगाने आम्ही बूथस्तरीय  कार्यप्रणालीच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता असे दिसून आले आहे की विरोधकांचे बूथही लागणार नाही, अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे.


विरोधकांचे बूथ लागतील तरी त्यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत की, यावेळी मोदीजींच्या गॅरंटीवर विकसनशील भारताकरीता यावेळी आम्हाला सहकार्य करा. मात्र आमच्या बूथ अध्यक्षांनी सांगितले आहे की, या ठिकाणी काँग्रेसचे बूथ लागणार नाही. त्यामुळे यावेळेस मोदीजींना साथ देण्याचा विचार काँग्रेसच्या लोकांनी केला असल्याचे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलतांना व्यक्त केले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या