Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार संजय शिरसाट (Sanjay shirsat) यांच्या कुटुंबाच्या गाडीवर दगडफेक(stone pelting) केल्याचा प्रकार घडला आहे. शहरातील बाबा पेट्रोल पंपाजवळील कामगार कार्यालयाच्या समोर रविवारी रात्री ही घटना घडली. दगडफेक झाली तेव्हा गाडीत शिरसाट यांची पत्नी, कन्या हर्षदा आणि मुलगा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
रस्त्याच्या कडेला भांडण सुरू असल्याचे दिसले म्हणून शिरसाट कुटुंबीयांनी रस्त्यात गाडी थांबवली. तेवढ्यात बाजूने जाणाऱ्या दुचाकीस्वाराने दुचाकी थांबवून शिरसाट यांच्या कुटुंबावर दगड भिरकावला. त्यामुळे चालक आणि कुटुंब गाडीच्या बाहेर उतरले. यानंतर दुचाकी स्वार पळून गेल्याचे सांगण्यात आले.
शहरात खळबळ, अधिक तपास सुरु
या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली असून घटनेनंतर अनेक शिवसैनिक इथे जमल्याचे दिसून आले. रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाबा पेट्रोल पंपा जवळील महावीर चौकाच्या जवळ काही लोकांचे भांडण सुरू होते. हे भांडण थांबवण्यासाठी कार थांबवली असता एका अज्ञात दुचाकीस्वाराने कारवर दगड फेकला. गाडीतून खाली उतरले असता दुचाकी स्वार पळून गेला. शिरसाट यांच्या गाडीवर दगड कुणी फेकला याचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा:
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप