मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्याने हे सरकार अधिक मजबूत झालं आहे, अजित पवारांच्या येण्यामुळे शिवसेनेत कुणीही नाराज नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde On Ajit Pawar) यांनी स्पष्ट केलं आहे. तर सरकार पडणार या केवळ अफवा असून माझ्या मागे मोदी-शाहांची (Eknath Shinde on Narendra Modi Support) ताकद असल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ (Ajit Pawar vs Sharad Pawar News) घेतल्यामुळे शिवसेनेतील आमदार नाराज असल्याची चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावरुन राजीनामा देणार असल्याच्याही बातम्या येत होत्या. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, अजित पवारांनी विकासाला साथ दिली आहे. आमच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सोबत घ्यायचं ठरवलं. गेल्या वर्षभरात झालेल्या विकासाला पाहून अजित पवार सोबत आले आहेत. अजित पवार सोबत आल्याने सरकार मजबूत झाले असून शिवसेनेत कुणीही नाराज नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालणारे लोक आहोत.
Eknath Shinde On Resignation : सरकार पडणार या अफवा
राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या काही बातम्या सातत्याने येत आहेत. त्यावर बुधवारी राज्याचे मंत्री उदय सामंत आणि शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केलं होतं. आज त्यावर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, ज्या दिवसापासून या सरकारचा शपथविधी झाला त्या दिवसापासून सरकार पडणार या अफवा सुरू आहेत. आतातर या अफवांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं पाठबळ आहे. त्यामुळे सरकारला काही धोका नाही.
Eknath Shinde On Uddhav Thackeray : विरोधकांनी आपलं जळतं घर पाहावं
अजित पवारांच्या शपथविधीनंतर शिवसेना ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला लक्ष्य केलं असून त्यांच्यावर सातत्याने टीका केली जात आहे. त्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, आपल्यावर होणाऱ्या टीकेला काहीही अर्थ नाही. विरोधकांनी पहिला आपल्या जळत्या घराकडे पाहावं, आत्मपरीक्षण करावं. गेल्या वर्षभरात जे काही चांगले निर्णय घेतले ते त्यांना बघवत नाही. लोकांना माहिती आहे सगळं, लोक पाहतात.
ही बातमी वाचा: