Maharashtra Politics: शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातील आरोप प्रत्यारोप काही थांबायचं नाव घेत नाहीये. आत्तापर्यंत एकमेकांवर टीका करणारे नेते आता थेट कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचले आहेत. असंच काही चित्र औरंगाबाद मध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी बंडखोर आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्या मुलीच्या लग्नासाठी मी पैसे दिले असल्याचा दावा केला. खैरे यांच्या याच दाव्याला बोरनारे यांनी उत्तर दिले आहे. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने एबीपी माझाशी बोलताना बोलणारे यांनी खैरेंवर निशाणा साधलाय.
बोरनारे काय म्हणाले?
खैरेंच्या आरोपाला उत्तर देताना बोलणारे म्हणाले की, "युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर मी कोणतीही टीका करणार नाही. पण इतर कुणाच्या टीका सहनही करणार नाही. खैरे यांनी माझ्या मुलीच्या लग्नाला 2 कोटी दिले असा आरोप केला. पण त्यांना पैसे मागायला मी काही भिकारी नाही.निवडणूक अर्ज भरतांना मी माझी संपत्ती 18 कोटी दाखवली आहे. एवढच नाही तर माझेच चंद्रकांत खैरे यांच्याकडे निवडणूकीत खर्च केलेले 50 लाख रुपये बाकी आहेत. त्यामुळे त्यांनी ते परत करावे", असे बोरणारे म्हणाले.
खैरेंच्या घरच्यांवर बोललो तर त्यांना कपडे सुद्धा राहणार नाहीत- रमेश बोरनारे
पुढे बोलतांना बोरणारे म्हणाले की, "खैरे माझ्या घरावर बोलले, मी त्यांच्या घरच्यांवर बोललो तर त्यांना कपडे सुद्धा राहणार नाहीत. माझ्या भावजयनं माझ्या विरोधात तक्रार केली होती. आमची युती झाल्यानंतर तो आता वाद संपला. आमचा घरगुती वाद होता. भाजपाने त्याला खतपाणी घातलं होतं. मात्र, आता प्रकरण मिटले आहे, असे बोरणारे म्हणाले.
हे देखील वाचा-
- Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik Updates : शिवसंवाद यात्रा नाशिक : आदित्य ठाकरे - सुहास कांदे येणार आमने सामने, वाचा प्रत्येक अपडेट्स
- Earthquake : कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का, कोयना धरणाला कोणताही धोका नाही
- तुम्ही कितीही यात्रा काढा, कितीही संभ्रम निर्माण करा; आमचीच शिवसेना खरी : दीपक केसरकर