Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik Updates : शिवसंवाद यात्रा नाशिक : आदित्य ठाकरे - सुहास कांदे येणार आमने सामने, वाचा प्रत्येक अपडेट्स
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik Updates : आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा (Shivsamvad Yatra) नाशिकमध्ये असून आमदार सुहास कांदे शक्ती प्रदर्शनाबरोबर निवेदन देणार आहेत.
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : आदित्य ठाकरे आज सकाळी काळाराम दर्शन घेऊन मनमाड कडे रवाना झाले. त्यानंतर मनमाड मध्ये त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. आता आदित्य ठाकरे हे येवल्याकडे निघाले आहेत. त्यांनतर ते पुढे वैजापूर मार्गे औरंगाबादला जाणार असल्याची माहिती आहे.
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : शिवसंवाद यात्रेदरम्यान एक आजी भेटल्या. त्यांनी सांगितलं कि आता मग हटायचं नाही, 'माझा विश्वास माझा उद्धव' हे सर्वांपर्यंत पोहचवायचं, पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बांधणीसाठी रस्त्यावर उतरायचं. यासाठी तुमच्या सगळ्याची साथ हवी आहे. नवा महारष्ट्र घडविण्यासाठी तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असुद्या असे आवाहन यावेळी उपस्थित शिवसैनिकांना आदित्य ठाकरे यांनी केले.
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : अल्पायुषी सरकार, तात्पुरत सरकार, लवकरच कोसळणार, नजेरला नजर मिळू शकत नव्हते, माझ्या चेहऱ्यावर आज स्वाभिमान, अभिमान आहे कारण मी विकलो गेलो नाही, सत्य बोला, गुंडगिरी चा काळ गेला, गुंडगिरी सोडा, समाजसेवा करा, लोकांची सेवा करा, लोक तुम्हालाही डोक्यावर घेऊन नाचतील, मात्र अशा पद्धतीने लोकांना फसवत राहिलात, वागत राहिलात तर हेच लोक तुम्हाला गाडतील, शिवसैनिकांचा आवाज बुलंद होईल, अशी विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : अडीच वर्षांपासून हे चालू होत, मात्र राजकरण किती घाणेरडं असत याचा नौभाव मागील दोन महिन्यात घेतला. आम्ही राजकारण केलंच नाही, आम्ही समाजसेवा करीत राहिलो, इकडे आपलेच गद्दार निघाल्याची भावना यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा मनमाड मध्ये सुरु असून दुसरीकडे सुहास कांदे समर्थकांचा मेळावा देखील सुरु असल्याचे दिसून येत आहे. तयामुळे आदित्य ठाकरे आणि सुहास कांदे आमने सामने आल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा मनमाड मध्ये सुरु असून दुसरीकडे सुहास कांदे समर्थकांचा मेळावा देखील सुरु असल्याचे दिसून येत आहे. तयामुळे आदित्य ठाकरे आणि सुहास कांदे आमने सामने आल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहे.
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : शिवसंवाद यात्रेत उपस्थित शिवसैनिकांना आदित्य ठाकरेंनी हे राजकारण तुम्हाला पटणार आहे का? असा सवाल केला. यावर मनमाडच्या शिवसैनिकांनी नाही शब्दात जोरदार घोषणाबाजी केली. याचबरोबर चांगला मुख्यमनातरी असताना बंडखोरांनी असं का केलं असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला. तर गद्दारांना प्रश्न विचारायचे नसतात, असे म्हणत सुहास कांदेवर टीकास्त्र सोडले.
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : आदित्य ठाकरे हे मनमाड मध्ये पोहचले असून शिवसैनिकांशी संवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधता आहेत. यावेळी म्हणाले कि, पुन्हा एकदा महाराष्ट्र बांधण्यासाठी तुमची साथ हवी आहे.
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : एकीकडे आमदार सुहास कांदे यांनी दहा हजार शिवसैनिकांसोबत आदित्य ठाकरे याना भेटण्याचे आव्हान दिले होते. मात्र आदित्य ठाकरे यांनी भेटीसाठी मातोश्रीवर यावं असे निमंत्रण सुहास कांदे याना दिले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे सुहास कांदे भेट होते कि नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : बारा खासदारांसमवेत शिंदे गटात सामील झालेले नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे प्रथमच बंडखोरीनंतर नाशिकमध्ये दाखल होत आहेत. तत्पूर्वी घोटी परिसरातील घाटनदेवी जवळ त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. हेमंत गोडसेंनी घेतलं घाटन देवीचं दर्शन, ढोल ताशांच्या गजरात स्वागत, त्याचबरोबर गोडसे समर्थकांनाच ताफा देखील त्यांच्यासोबत होता. यावेळी घोटीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे.
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : बारा खासदारांसमवेत शिंदे गटात सामील झालेले नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे प्रथमच बंडखोरीनंतर नाशिकमध्ये दाखल होत आहेत. तत्पूर्वी घोटी परिसरातील घाटनदेवी जवळ त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. त्याचबरोबर गोडसे समर्थकांनाच ताफा देखील त्यांच्यासोबत होता. यावेळी घोटीत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. हेमंत गोडसे देखील आदित्य ठाकरे यांच्या भेट घेणार असल्याचे समजते. शिवाय हेमंत गोडसेंच्या विरोधात नाशिकचे शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या भेटीला रवाना झाले आहेत.
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त नाशिकमध्ये असून सुहास कांदे हे त्यांना भेटणार होते. मात्र तत्पूर्वीच कांदे यांचा ताफा पिंपळगाव टोलनाक्यावर अडवला असून कांदे आणि शिवसैनिकांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. तर इकडे नाशिकमधून आदित्य ठाकरे हे मनमाडकडे रवाना झाले आहेत.
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त नाशिकमध्ये असून थोड्यावेळापूर्वी त्यांनी काळाराम मंदिराचे दर्शन घेतले आहे. अशातच मनमाड येथे त्यांचा मेळावा असून या ठिकाणी दहा हजार शिवसैनिकांसोबत आदित्य ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले. त्यामुळे मनमाडमध्ये आदित्य ठाकरे आणि आमदार सुहास कांदे आमने सामने येणार असल्याचे दिसते.
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेनिमित्त नाशिकमध्ये असून थोड्यावेळ पूर्वी ते काळाराम मंदिरात दाखल झाले असून त्यांनी काळारामाचे दर्शन घेतले आहे. त्याचबरोबर मंदिर पुजाऱ्यांकडून विधिवत पूजा देखील केली आहे. आता काही वेळानंतर ते मनमाड कडे मार्गस्थ होणार आहेत. मात्र कांदेने आव्हान दिल्यानंतर आदित्य ठाकरे मनमाड कडे जाणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे.
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik : शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना आज थेट बंडखोर आमदारांचाच सामना करावा लागण्याची चिन्हं आहेत. कारण आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज मनमाडचे शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात आहे. तत्पूर्वी ते नाशिक शहरातील काळाराम मंदिरात दर्शनासाठी जात आहेत. काळाराम मंदिर प्रशासनाकडून ददित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर ते मनमाड ला रवाना होणार असल्याची माहिती आहे.
पार्श्वभूमी
Aditya Thackeray Shivsamvad Yatra Nashik Updates : शिवसेना आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) निवेदन देणार आहेत. सुहास कांदे शिंदे गटात सामील झाले आहेत. मनमाडमध्ये (Manmad) आदित्य ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात सुहास कांदे चार ते पाच हजार कार्यकर्ते घेऊन मनमाडला जाणार आहेत. याबाबत मनमाडमध्ये होर्डिंग देखील लावले आहेत. 'माझं काय चुकलं' या आशयाखाली मतदारसंघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरुन शिवसेना कशी दूर गेली याचा उल्लेख या निवेदनात असणार आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघार्षानंतर आदित्य ठाकरे ठिकठिकाणी जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. यासाठी त्यांची शिव संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. 21 ते 23 जुलै असा या यात्रेचा कालावधी असून ही यात्रा भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डी अशी असणार आहे. काल ही यात्रा भिवंडीत होती. त्यानंतर इगतपुरी आणि नाशिक इथे मेळावा झाला. आज मनमाड इथे त्यांचा मेळावा होणार आहे.
परंतु आदित्य ठाकरे यांच्या या मेळाव्याआधी बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी काही प्रश्न विचारले आहेत. पालघर साधू हत्याकांड, मालवण येथील हिंदूंचं पलायन, स्वातंत्र्यवीर सावरकर या हिंदुत्वाच्या मुद्द्यापसून शिवसेना दूर गेली, यावर 'माझं काय चुकलं' असं म्हणत सुहास कांदे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यांच्या या निवेदनात छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्यासोबत युती केल्याचीही खंत व्यक्त करण्यात आली आहे. हे निवेदन आदित्य ठाकरे यांना देण्याआधीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करत कांदे यांनी आदित्य ठाकरे यांना अनेक सवाल विचारले आहेत. आदित्य ठाकरे यांना या सगळ्या प्रश्नांचे निवेदन देण्यासाठी सुहास कांदे चार ते पाच हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहेत. सुहास कांदे यांच्या या भूमिकेमुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुहास कांदेच 'माझं काय चुकलं'
शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना आज थेट बंडखोर आमदारांचाच सामना करावा लागण्याची चिन्हं आहेत. कारण आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज मनमाडचे शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात आहे. आणि कांदे यांनी या दौऱ्यात चार ते पाच हजार कार्यकर्त्यांना घेऊन आदित्य ठाकरे यांना भेटणार असल्याचं जाहीर केलंय. माझं काय चुकलं अशा आशयाचं निवेदन घेऊन कांदे आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि बंडखोर आमदार आमनेसामने येण्याची चिन्हं आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -