Maharashtra Politicis News : अजितदादांनी (Ajit Pawar) काल  शरद पवारसाहेबांना (Sharad Pawar) भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ही चांगली बाब आहे. पण त्याचा अर्थ दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा लावला गेला. असं झालं तर आम्हाला आनंदच होईल, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी केलं आहे. आमच्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दोन्ही पवारांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, याचा फायदाच होईल असेही  काकडे म्हणाले. भविष्यात काय होईल सांगता येत नाही असंही ते म्हणाले.  


वार साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्याला कोणताही कार्यकर्ता विरोध करणार नाही


कार्यकर्ते आणि काही प्रमुखांची इच्छा आहे की, दोन्ही नेत्यांनी पुन्हा एकत्र येऊन काम करावं. 
तसे झाल्यास आनंदाची गोष्ट असेल असंही अंकुश काकडे म्हणाले. सुनंदा पवार यांच्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी देखील मोठं वक्तव्य केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, याबाबतचा अंतिम निर्णय पवार साहेब हेच घेतील असंही अंकुश काकडे म्हणाले. पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील अडचण राहणार नाही असंही यावेळी अंकुश काकडे म्हणाले. पवार साहेबांनी जर निर्णय घेतला तर त्याला कोणताही कार्यकर्ता पदाधिकारी विरोध करेल असं वाटत नाही असेही काकडे म्हणाले. 


नेमकं काय म्हणाल्या सुनंदा पवार?


सुनंदा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत, असे मत व्यक्त केले आहे. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावे, ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे, त्याचा आदर केला पाहिजे. दोन्ही पिढ्या कित्येक वर्षे आम्ही एकत्र राहतोय. मला ही वैयक्तिकरित्या वाटते की, एकत्र यावे.  याबाबतचा निर्णय पवार साहेब आणि अजितदादाच घेतील. पवार साहेब यांचा काल वाढदिवस होता. कुटुंबातील सगळे त्यांना भेटण्यासाठी गेले होते यात गैर नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावे ,अशी कार्यकर्त्याची इच्छा आहे, मलाही तसेच वाटतेय. राजकारणात कार्यकर्ता महत्वाचा असतो. त्यामुळे विखुरलेले राहण्यापेक्षा एकत्र येणे योग्य ठरेल. आम्ही स्वतंत्र काम करतो, कुटुंबीयांची ताकद आहे, त्यामुळे एकत्रित यावे अस मला ही वाटते. नवीन लोकांना संधी दिली पक्षाने हे चांगले आहे. राज्यात आलेल्या विधानसभा निकालावर माझा विश्वास नाही. राज्यात एवढी नाराजी अनेक प्रश्नांवर असताना हे निकाल पटत नाही. अजितदादा भेटतील तेव्हा मी शुभेच्छा नक्की देईल, असेही सुनंदा पवार यांनी म्हटले.


महत्वाच्या बातम्या:


Ajit Pawar & Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत; रोहित पवारांच्या आईचं मोठं वक्तव्य