Sanjay Raut : सत्य बोलल्यामुळं जर मला कोणी टार्गेट करत असेल तर मी मागे हटणार नाही. मी सत्य बोलतच राहणार, मी कोणाच्या बापाला घाबरत नसल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केलं. मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. माझ्यावर खापर का फोडता? ते फोडण्याचा कारण काय? असा सवालही संजय राऊत यांनी केलं. काल (18 एप्रिल) विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) यांनी राऊतांना टोला लगावत आमची वकिली करण्याची गरज नाही, असं म्हटलं होतं. यावर आता संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
जे सत्य आहे ते मी लिहत राहणार
जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होता. मला जरी कोणी टार्गेट करत असेल तरी मी सत्यच बोलणार. मी कदापि मागे हटणार नाही. सामना नेहमी सत्य लिहितो. अनिल देशमुख असतील जितेंद्र आव्हाड असतील अशी किती जणांची नावं आहेत की त्यांच्यावर यंत्रणांचा दबाव आहे. जे सत्य आहे ते मी लिहित राहणार आणि बोलतच राहणार असल्याचे राऊत म्हणाले.
सत्य जर कोणाला टोचत असेल तर मी काय करु
महाराष्ट्रात विरोधी पक्ष फोडण्याचे काम सुरु आहे. हे सत्य आहे की असत्य आहे अजित पवार यांनी सांगायला पाहिजे असे संजय राऊत म्हणाले. या सर्व बातम्यांची मी माहिती ठेवतो यामध्ये गैर काय असेही राऊत म्हणाले. मी लिहलेलं टोकदार सत्य जर कोणाला टोचत असेल तर मी काय करु असेही राऊत म्हणाले.
आम्ही सगळे अजित पवार यांच्यावर प्रेम करणारी माणसे
आम्ही सगळे अजित पवार यांच्यावर प्रेम करणारी माणसे आहोत. महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत राहावी या मताचे आम्ही आहोत. आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत. काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल हे पक्ष जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून तोडण्याचा प्रयत्न होतो तेव्हा आम्ही सगळे एकत्र येतो असेही राऊत म्हणाले. शिवसेना फुटत असताना शरद पवार असतील अजित पवार असतील नाना पटोले असतील या सर्वांनी चिंता व्यक्त केलीच होती तशी आम्ही चिंता व्यक्त करतो असेही राऊत म्हणाले. आपल्या बरोबरचा प्रत्येक घटक पक्ष मजबूत राहावा हीच आमची भूमिका आहे. यावर जर कोणी खापर फोडत असेल तर गंमत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: