Rohit pawar : हे सरकार फक्त कमिशन घेण्यात व्यस्त असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली. लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana) मध्य प्रदेशमध्ये चालली पण ही योजना महाराष्ट्रातही (Maharashtra) चालेलच असं नाही. ही योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत नीट पोहोचवा. सरकारी योजनेचा लाभ हा सर्वांना मिळणं गरजेचं असल्याचे रोहित पवार म्हणाले. 1500 रुपयात काय होणार? असा सवालही त्यांनी केला. हे सरकार नोकरी देण्यात कमी पडलं आहे. हे सरकार मुलभूत व्यवस्थेत कमी पडल्याचे पवार म्हणाले. 


महाराष्ट्रातील नेते दिल्लीत शेतकऱ्यांसाठी नाहीतर तिकिट मागण्यासाठी जातात.


महाराष्ट्रातील नेते दिल्लीत शेतकऱ्यांसाठी नाहीतर तिकिट मागण्यासाठी जातात. विखे पाटलांचं दिल्लीत किती चालतं हे बघावं लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पावर यांनी केलं.  ज्या खेळाडूंनी आपल्याला वर्ल्ड कप दिला त्यांचे फोटो न लावता राजकारणी आपले फोटो लावत असल्याचे रोहित पवार म्हणाले. राजकारण्यांना वाटत असेल की, त्यांच्यामुळेच हा वर्ल्डकप जिंकला आहे, हे राजकरणी स्वत:चीच टिमकी वाजवत असल्याचे रोहित पवार म्हणाले.


कालच्या गर्दीच नियंत्रण सरकार आणि BCCI ने करायला हवं होतं


महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर या खेळाडूंचा सत्कार करेल. यावेळी आम्ही फक्त खेळाडूंचे बॅनर लावू, त्यावर राजकारण्यांचे फोटो नसतील असे रोहित पवार म्हणाले. क्रिकेटवर भारतातील लोकांचं खूप प्रेम आहे. त्यामुळं कालच्या भारतीय संघाच्या रॅलीमध्ये खूप गर्दी झाली होती. कोणालाही दुखापत झाली नाही. पण या गर्दीच नियंत्रण सरकार आणि BCCI ने करायला हवं होतं असे रोहित पवार म्हणाले. पण भारतीय संघ वर्ल्ड कप घेऊन आला होता, त्यामुळे तो वर्ल्ड कप आणि भारतीय संघातील खेळाडूंना पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींनी गर्दी केली होती.


वर्ल्ड कप जिंकण्यात आणि खेळात कोणतंही राजकीय गणित आणू नये


टीम इंडियाचा बॅनरवर खेळाडू नसून स्वतः मंत्र्यांचे फोटो आहेत, नेत्यांना स्वतःची टिमकी वाजविण्यात इंटरेस्ट असल्याचे रोहित पवार म्हणाले. जसा काय हा वर्ल्ड कप यांनीच जिंकला असल्याचा पवारांनी लगावला. वर्ल्ड कप जिंकण्यात आणि खेळात कोणतंही राजकीय गणित आणू नये असे पवार म्हणाले. महायुतीचे खेळाडूंना महाविकास आघाडी नक्की पराभूत करेल असे पवार म्हणाले. 


महायुतीचे नेते पदात अडकून पडलेत


महायुतीत चढाओढ कायम राहिल, यात महाविकास आघाडीचे नेते निवडून येतील असे रोहित पवार म्हणाले. महायुतीचे नेते पदात अडकून पडले आहेत. महाविकास आघाडीत मात्र तसं चित्र नाही. दुधाबाबत अडीच हजार कोटीचं नुकसान झालं आहे. सोयाबिनबाबत 35 हजार कोटीचं नुकसान झाल्याचे पवार म्हणाले.


महत्वाच्या बातम्या:


''गुजरातच्या बसला आम्ही पार्कींगची जागा देऊ, पण टीम इंडियाला मुंबईच्या 'बेस्ट' बस मधूनच फिरवा''