Nana Patole : विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) भाजप आणि त्यांची पिलावळ 100 च्या आता राहिल आणि महाविकास आघाडी 180 च्या पुढे जाईल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला. याबाबतची माहिती एका अहवालातून देण्यात आली असल्याचे पटोले म्हणाले. महराष्ट्रात आता परिवर्तनाची लाट सुरु झाली असल्याचे पटोले म्हणाले. लोकांच्या घामाचे पैसे हे बेरंगी लोक हडप करत असल्याचे म्हणत पटोलेंनी मुख्यमंत्र्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली.
खासदार अशोक चव्हाण यांना टोला
मराठवाडा हा काँग्रेसचा (congress) आहे. त्यामुळं ही गाडी नांदेडकडे घेऊन जाऊ. आता नांदेडची (Nanded) गाडी स्वच्छ ठेवू असे म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना टोला लगावला. राज्यात भाजपचच सरकार आहे. एकनाथ शिंदे हे फक्त मुखवटा असल्याचे पटोले म्हणाले. भाजपने दोन समाजामध्ये भांडण लावल्याचे काम केल्याचे पटोले म्हणाले.
महाराष्ट्रात जर आमचं सरकार आलं तर कर्नाटकसारखी महालक्ष्मी योजना सुरु करु
हे सरकार जाहीरातबाजी करत आहे. महाराष्ट्रात जर आमचं सरकार आलं तर कर्नाटकसारखी महालक्ष्मी योजना सुरु करु असे पटोले म्हणाले. मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित 3 खासदारांचा महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्यासह काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते लातूरमध्ये जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी देशमुख बोलत होते. दोन कोटी रोजगार देऊ, प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख टाकू असे भाजपने सांगितले. पण यातील काही झालं नसल्याचे नाना पटोले म्हणाले. अलीकडे फडणवीस सांगत आहेत की, यांना सगळ्यांना ठोकून काढा. पदावर बसलेला माणूस असं बोलत असल्याचे पटोले म्हणाले.
भाजप जनतेला गुलामीकडे नेण्याचं काम करत आहे
भाजप जनतेला गुलामीकडे नेण्याचं काम करत आहे. यांची व्यवस्था ही मनुवादी आहे. विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. राज्याचा स्वाभिमानी या सरकारने गुजरातमध्ये नेण्याचं काम केल्याचे पटोले म्हणाले. भाजपची व्यवस्था ही नकली आहे. पुढच्या निवडणुकीत लातूर, बीड आणि धाराशीव जिल्ह्यातील जनतेला मी सांगत यांना बुडासकट उपटून फेका असे म्हणत पटोलेंनी महायुतीवर टीका केली. राज्यात भाजपचेच सरकार आहे. एकनाथ शिंदे हे केवळ मुखवटा असल्याचे पटोले म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Nana Patole on Maharashtra CM : महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? नाना पटोलेंनी एका वाक्यात नाव सांगितलं!