Maharashtra Politicis : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात रात्री उशीरा वर्षा निवासस्थानी बैठक झाली. ही बैठक तब्बल तीन तास चालली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारही (Ajit Pawar) उपस्थित होते. मात्र, वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस दाखल झाल्यानंतर तब्बल एक तास नऊ मिनिटांनी अजित पवार दाखल झाले होते. तर एक तास आगोदरच मिटिंग संपवून ते आपल्या देवगिरी निवासस्थानी रवाना झाले. दरम्यान, या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तार आणि खाते वाटप यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार एक तास 23 मिनिटे बैठकीला हजर
राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. तसेच खाते वाटपासंदर्भातही चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला अजित पवार हे एक तास उशिरा पोहोचले आणि एक तास आगोदर मिटिंग संपवून आपल्या देवगिरी निवासस्थानी रवाना झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत एक तास 23 मिनिटे बैठकीला हजर होते. अजित पवार गेल्यानंतर एक तासानंतर देवेंद्र फडणवीस त्यांच्या सागर या निवासस्थानी रवाना झाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री 11 वाजून 12 मिनिटांनी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. तर 2 वाजून 9 मिनिटांनी वर्षा निवासस्थानाबाहेर पडले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे वर्षा बंगल्यावर 12 वाजून 3 मिनिटांनी दाखल झाले आणि 1 वाजून 26 मिनिटांनी वर्षा निवासस्थानावरून देवगिरी निवासस्थानी रवाना झाले. एक तास अगोदर आणि एक तास नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अनुपस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बैठक झाली.
अर्थ,ऊर्जा, गृहनिर्माण खात्यावर अजित पवार गटाचा डोळा?
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर इतर राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादीच्या (NCP) नऊ मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेऊन आठवडा उलटला आहे. मात्र अद्यापही ते बिन खात्याचेच मंत्री आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विशिष्ठ खात्यांचा आग्रह धरला जातोय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. म्हणजेच अर्थ, ग्रामविकास, सामाजिक न्याय, ऊर्जा, गृहनिर्माण, महिला आणि बालविकास, आणि अल्पसंख्याक खाती राष्ट्रवादीला हवी आहेत. तसंच, क्रीडा आणि शिक्षण यापैकी एका खात्यावरही अजित पवार (Ajit Pawar) गटाचा डोळा असल्याचं समजतंय. मात्र अर्थ खातं अजित पवारांना देण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या:
Ajit Pawar: अर्थ,ऊर्जा, गृहनिर्माण खात्यावर अजित पवार गटाचा डोळा? अर्थ खातं देण्याला शिवसेनेचा विरोध : सूत्र