Maharashtra Politics Ajit Pawar:  'शासन आपल्या दारी' या धुळ्यातील कार्यक्रमादरम्यान झेंड्याचा प्रश्न चांगलाच गाजल्याचे बघावयास मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) झेंडा पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी लावला नसल्याची खंत देखील अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या भाषणा दरम्यान बोलून दाखवली आहे. तर यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काही गोष्टींना वेळ लागतो असं म्हणत अजित पवारांना उत्तर दिले. तर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी देखील हे पंधरा दिवसांपूर्वीच नियोजन असल्याचं म्हणत अप्रत्यक्षपणे पंधरा दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी होण्यापूर्वीच हे नियोजन असल्याच मत व्यक्त केल आहे.


'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री गिरीश महाजन हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाची तयारी पालकमंत्री या नात्याने गिरीश महाजन यांनी केली होती. कार्यक्रम स्थळाबाहेर भाजप आणि शिवसेनेचेच झेंडे फडकले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झेंडे या ठिकाणी न लावल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली नाराजी उघडपणे आपल्या भाषणादरम्यान बोलून दाखवली. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या कार्यक्रमाची उत्तम तयारी केली. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा न लावल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की,   पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचं काम चांगल असून, तुम्ही यात तरबेज आहात.  या पुढील कार्यक्रमांमध्ये आमचे देखील झेंडे लावावेत असा टोला लगावला. आपल्या भाषणात असा टोला लगावत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश महाजन यांना आता तीन पक्षांचे सरकार असल्याची आठवण करून दिली असल्याची चर्चा रंगली.


मुख्यमंत्र्यांकडून सारवासारव


तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आपल्या भाषणातून अजित पवार यांच्या झेंड्याच्या मुद्द्यावर भाष्य केले. अजित पवार यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले की, आमची गेल्या 25 वर्षापासूनची युती असल्याची आठवण करून दिली. यापुढील कार्यक्रमांमध्ये तीनही पक्षांचे झेंडे लावण्यात येतील असे आश्वासन दिले. या संदर्भात शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांनी देखील आपलं मत व्यक्त केले. आज झालेला हा कार्यक्रम 15 दिवसांपूर्वीच नियोजित करण्यात आला होता. 15 दिवसांपूर्वी अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी नसतानाच हे नियोजन असल्याचं स्पष्टीकरण मंत्री दादा भुसे यांनी देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. 


दरम्यान, रविवारी झालेल्या एका कार्यक्रमातही मुख्यमंत्री शिंदे यांनी डबल इंजिनचे सरकार असल्याचा उल्लेख केला. अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सहभागी झाल्याची बाब त्यांच्या लक्षात आली नसल्याची चर्चा रंगली होती. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: