Sudhir Mungantiwar Majha katta : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो. कारण मराठा समाज हा अशा प्रकारची हिंसक आंदोलक कधीच करु शकत नाही, अशी भूमिका जरांगे पाटील मांडली आहे. त्यामुळं मी त्यांच्या मताशी सहमत असल्याचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar( म्हणाले. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. याआधीही मराठा समाजाने अनेक मोर्चे आंदोलने केली पण अशा अघटीत घटना कधी घडल्या नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.


हिंसक आंदोलनामागे कोणाचा तरी हात 


हिंसक आंदोलन कोणत्याही मराठा समाजाच्या व्यक्तीला मान्य नाही. याचे समर्थन कोणाही करु शकत नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. राज्यात होणाऱ्या हिंसक आंदोलनामागे कोणाचा तरी हात आहे. हे शोधण्याचं काम राज्याचा गृहविभाग करेल असे सुदीर मुनगंटीवार म्हणाले. हिसंक आंदोलनामागे एखाद्या राजकीय पक्षाचा नेता देखील असू शकतो असे मुनगंटीवार म्हणाले. दोन समजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम काहीजण करत असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. 


मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार सकारात्मक


सरकारी निर्णय हा संविधानाच्या चौकटीत राहूनच घ्यावा लागेल असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत सकारात्मक आहेत. कुठेही जर तर असे नाही. आरक्षण द्यायचे म्हणजे द्यायचेच या मुद्यावर ठाम असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.


मुनगंटीवार यांनी सांगितला तो किस्सा


एकदा नितीन गडकरी मला म्हणाले होते की, एका नेत्यांच्या बाबतीत तू असे मत व्यक्त करु नको. ते फार मोठा माणूस आहेत. त्यानंतर त्या नेत्याची माझी भेट झाली, त्यानंतर समजले की माझे त्या नेत्याबाबत चुकीचे मत होते असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी त्या नेत्याचे नाव सांगण्यास नकार दिला. पण तो नेता सध्या विरोधी पक्षात असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. आमचं सरकार हे गद्दारी करुन पाडलं होतं. पण योग्य वेळी त्याचं उत्तर आल्याचे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. जो जैसा करेगा वैसे भगेगा असे म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेनेला टोला लगावला.  


महत्त्वाच्या बातम्या:


Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाण्याला हात लावणार नाही; जरांगे यांचा एल्गार