Rohit Pawar On NCP Anniversary: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (NCP) वर्धापन दिन हा अहमदनगर जिल्ह्यात साजरा केला जाणार आहे. दरम्यान शरद पवारांनी यासाठी अहमदनगरचीच निवड का केली असावीत याबाबत देखील वेगवेगळ्या चर्चा पाहायला मिळत आहे. अजित पवारांचं अहमदनगर जिल्ह्यातील वाढत्या वर्चस्वाला लगाम घालण्यासाठी आणि रोहित पवार यांना मोठी जबाबदारी देण्यासाठी शरद पवारांची ही खेळी असल्याची देखील चर्चा आहे. मात्र यासर्वांवर आता रोहित पवार (Rohit Pawar) यांची प्रतिक्रिया आली आहे. मराठवाड्यातील आमदारांना येण्यासाठी तसेच इतरही जिल्ह्यातील आमदारांना येण्यासाठी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने अहमदनगर जिल्ह्याची निवड करण्यात आल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन हा अहमदनगर जिल्ह्यात साजरा केला जाणार आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्याचे निवड का केली गेली यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ देखील अहमदनगर जिल्ह्यातच येतो. त्यामुळे येत्या काळात राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांना काही मोठे जबाबदारी दिली जाते का? अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले की, अहमदनगर निवडण्याचं कारण म्हणजे अहमदनगर मध्यवर्ती ठिकाणी आहे. मराठवाड्यातील आमदारांना येण्यासाठी तसेच इतरही जिल्ह्यातील आमदारांना येण्यासाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे अनेक आमदार आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याची निवड करण्यात आल्याचं रोहित पवार म्हणाले. तर एक कार्यकर्ता म्हणून माझ्यावर जर काही जबाबदारी दिल्यास ती नक्कीच पूर्ण करेल असेही पवार म्हणाले. मात्र पक्षात खांदेपालट होणार असल्याची चर्चा सुरू आहे का? याबाबत बोलताना त्यांनी विषयाला बगल देत इतर विषयांकडे आपला मुद्दा वळवला.
शिंदे आणि विखेंमध्ये मोठा नेता कोण हे त्यांनी ठरवावं
जामखेड बाजार समितीत विखे आणि पवार यांच्यात छुपी युती असल्याचा आरोप आमदार राम शिंदे यांनी केला आहे. याबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की, बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपच्या कुठल्याही नेत्याने मला मदत केलेली नाही. राहिला प्रश्न त्या दोघांच्या वादाचा, तो भाजपाचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे दोघांनी बसावं आणि दोघांमध्ये मोठा नेता कोण हे ठरवावे. टीव्हीवर अशा पद्धतीने खोटे बोलून दुसऱ्यावर खापर फोडायचं असेल तर आधी स्वीकाराला शिका. उगाच कोणाच्या डोक्यावर खापर फोडू नका असा सल्ला रोहित पवारांनी राम शिंदेंना दिला.
इतर महत्वाच्या बातम्या: