Chhagan Bhujbal On BJP : केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकप्रकारे युद्ध सुरू आहेत. ईडीकडून संजय राऊत यांच्या मालमत्तेवर जप्ती आणल्यानंतर राऊतांनी देखील किरीट सोमय्यांवर निशाणा साधत 'आयएनएस विक्रांत' मोहिमेत घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर एका जाहीर सभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपाला इशारा देत जाहीर आव्हान दिलं आहे. तसेच शेरोशायरीच्या माध्यमातून भाजपावर आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. 


मुंह मे राम आणि बगल मे छुरी... 
भाजप आणि केंद्र सरकारचं असं आहे, मुंह मे राम आणि बगल मे छुरी... भारताचे पंतप्रधान म्हणाले, जनतेच्या खात्यात 15 लाख येतील, पण कुठे आहेत ते? किमान पंधरा रुपये तर द्या, नोकऱ्या म्हणाले, कुठे आहेत नोकऱ्या? दाढीवाला बाबा ( रामदेव बाबा ) म्हणाले पेट्रोल 25 रुपये होईल, कुठे झाला? आता मला त्यांना विचारायचं आहे, आता 125 रुपये पेट्रोल बघून कसं वाटतं? स्मृती इराणी गॅस स्वस्त होण्याबद्दल म्हणाल्या होत्या, आज गॅस 1 हजार रुपये झाला आहेत, भाजपची कथानी एक, आणि करणी दुसरी अशा मिश्कील शब्दात भुजबळांनी भाजपला टोला लगावला आहे.  


राज्यातील महत्वाच्या विषयांवर भुजबळांचा भाजपावर निशाणा
महाराष्ट्र मध्ये कोरोना आटोक्यात आणलं, त्याच सर्वत्र कौतुक झालं, दुर्दैवाने काही मृत्यू झाले, रेमडिसिव्हीर मिळत नव्हतं, लस महाराष्ट्रात तयार होतं होती, पण आपल्याला मिळत नव्हती का? या सर्वांवर केंद्राचे कंट्रोल होतं असे आरोप भुजबळ यांनी भाजपवर केले आहेत, कोरोना काळात आरोग्य, पोलीस खात्याने चंगल काम केले, पण या सोबत अन्न धान्य विभागाने ही चांगल काम केलं. गाव खेड्यात जाऊन लोकांना अन्न उपलब्ध करून दिलं. राज्य सरकारच्या बाबतीत केंद्र सरकारच्या मनात आकस आहेत. असे भुजबळ यावेळी म्हणाले. जीएसटीचा परतावा मिळाला नाही, हजारो कोटी रुपये आले असते तर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देता आलं असतं, मात्र तरी देखील आम्ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहोत, विजेचा प्रश्न झाला, आम्ही निर्णय घेतलं आणि तीन महिन्यासाठी वीज कपात थांबली, विजेच्या प्रशांनावर थोड्या वेळात कॅबिनेट मिटिंग आहे, प्रश्न गहन आहे तो सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय.


वसंत मोरे हे हिंदूचं आहेत, पण का काढून टाकलं?
मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसेचे डॅशिंग नगरसेवर वसंत मोरे (Vasant More) यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस वाढत असतानाच वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आले. राज ठाकरे यांची सही असलेला आदेश पक्षातर्फे जारी करण्यात आला आहे. यावर भुजबळांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, वसंत मोरे हे हिंदूचं आहेत पण त्यांनी काहीतरी बोलले की काढून टाकलं, त्यांचं म्हणणं तर ऐकून घ्या असा सल्ला भुजबळांनी राज ठाकरेंना दिला आहे.


... नाहीतर भोंगा लाव, काढ हे विषय चालू राहतील
राष्ट्रवादी आणि समता परिषद दोघांना एकत्रित काम करायचे आहे म्हणून बैठक घेतली. 11 तारखेला महात्मा फुले जयंती, 14 तारखेला बाबासाहेब जयंती, सावित्रीबाई, शाहू महाराज जन्म्शाताब्दी सुरु होतं आहे. हे सगळे आपले देव आहेत. गरीब वंचित घटकांतील नागरिकांना जनावरांसारखी वागणूक मिळत असताना यांनी माणसात आणलं, त्यामुळे यांच्या जयंती निमित्त जास्तीत कार्यक्रम केले पाहिजे. धर्माच्या नावाने विरोधी पक्षाला किती ही प्रचार करून द्या, फुले शाहू यांचे विचारच वाचवू शकतील, नाहीतर भोंगा लाव, काढ हे विषय चालू राहतील. धर्माचे तेढ निर्माण करून मत मागतात