Kirit Somaiya On Yashwant Jadhav : शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या संपत्तीवर आयकर विभागानं टाच आणली आहे. त्यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता आयकर विभागानं जप्त केल्या आहेत. याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, त्यांनी यासंदर्भात ट्वीटही केलं आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर विभागाकडून आज मुंबई येथे बेनामी मालमत्तांच्या जप्त करण्याचा कारवाईचे मी स्वागत करतो, असं ट्वीट करत किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
किरीट सोमय्यांचं ट्वीट :
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उघडलेल्या विक्रांत फाईल्सबाबत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, आयएनएस विक्रांतसाठी केवळ 35 मिनिटंच निधी गोळा केला. एवढ्या वेळात मी असे किती पैसे गोळा करु शकतो. 10 डिसेंबर 2013 रोजी प्रतिकात्मक कार्यक्रम केला होता फक्त. काँग्रेसनंही भिक मांगो आंदोलन केलं होतं. मग त्यांनी किती पैसे गोळा केले? असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत. तसेच, मुंबई पोलीस ऐकीव माहितीवर एफआयआर कशी दाखल करू शकतात? एकही कागद नसताना त्यांनी एफआयआर कशी करून घेतली? असा सवालही किरीट सोमय्यांनी मुंबई पोलिसांना केला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, "यशवंत जाधव यांनी तब्बल एक हजार कोटींची मालमत्ता गोळा केली आहे. आधीच 15 कोटींचं ट्रान्झॅक्शन झाल्याची माहिती आम्ही दिली होती. त्यानंतर आयकर विभागानं धाडी घातल्या होत्या. तेच पुरावे आम्ही ईडीलाही दिले आहेत. आज आयकर विभागाची कारवाई सुरु झाली. कारण त्यांनी ज्या जुन्या मालमत्ता, आता स्वतःच्या नावावर 37 आहेत. मला आणखी माहिती मिळाली की, त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर इतर 11 मालमत्ता आहेत. या सर्व मालमत्तांवर आता बेनावी संपत्तीच्या अंतर्गत आयकर विभागानं कारवाई सुरु केली आहे."
"उद्धव ठाकरे आणि शिवसेनेसाठी मुंबई महापालिका म्हणजे, एटीएम. खरं म्हणजे, एटीएम ही तुमच्या आमच्यासाठी त्यांच्यासाठी तर ही रिझर्व्ह बँक. नोटा छापण्याची एक मशीन नाही, तर मशीन्स. यशवंत जाधवांच्या घरातील एका व्यक्तीनं सांगितलं की, आमच्याकडे 10 टक्के येतात, उर्वरित 90 टक्के वर जातात, वर. वर म्हणजे कुठे? तर वांद्र्याला. पाच वर्ष स्टँडिंग कमिटी चेअरमन, दरवर्षी 50 हजार कोटींचं बजेट. विचार करा, त्याचे पार्टनर विमल अग्रवाल, यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव ज्या आमदार आहेत, त्यांनी जे निवडणूक प्रतिज्ञापत्र भरलं होतं, तिथूनच या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली."
यशवंत जाधवांच्या संपत्तीवर टाच
शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) सध्या आयकर विभागाच्या (Income Tax) रडारवर आहेत. अशातच आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवर टाच आणली आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे.
मुंबई महापालिकेतील (BMC) शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता आयकर विभागानं जप्त केल्या आहेत. त्यात भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्स या इमारतीतील 31 फ्लॅट्स आणि वांद्रे इथल्या 5 कोटी रुपये किंमतीच्या एका फ्लॅटचा समावेश आहे. आयकर खात्यानं काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यात त्यांना मिळालेल्या माहितीनंतर आता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.