Kirit Somaiyya : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut press conference) यांनी शिवसेना भवनातील (Shiv Sena Bhawan) आपली दुसरी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रात ईडी, (ED Raid) सीबीआय आणि आयटीच्या धाडीवरुन संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. त्यावर भाजपाचे किरीट सोमय्या (BJP Kirit Somaiyya) यांनी प्रत्युत्तर देत आरोप केलेत. काय म्हणाले सोमय्या?


संजय राऊत मला एजंट म्हणत असतील तर मी..


संजय राऊत मला एजंट म्हणत असतील तर त्याला दमडीची किंमत नाही. मी हसत हसत पुढे जाणार. मी ज्या तक्रारी करतोय त्यात तथ्य आणि दम असतो. त्यामुळे त्यात कारवाई होते. न्यायालय त्यांना दाद देत नाही. मग न्यायालय पाचवा एजंट आहे असं सामना मध्ये लिहा, आहे का हिम्मत? असे म्हणत सोमय्यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्यांनी जी कागदपत्रे दिली त्याआधारे अनिल परबांचं रिसॉर्ट अनधिकृत आहे, असं स्पष्ट झालं. तर सोमय्या ईडीचा एजंट होईल की जनतेचा एजंट होईल? असा सवाल सोमय्यांनी ठाकरे सरकारला केलांय. जर सोमैय्याच्या तक्रारीवरून जरंडेश्वर साखर कारखाना बेनामी आहे, हे सिद्ध झालं तर अजित पवारांनी मला ईडीचा एजंट म्हटलं तर मला जरा ही लाज वाटणार नाही. पण संजय राऊत मला एजंट म्हणत असतील तर त्याला दमडीची किंमत नाही. मी हसत हसत पुढे जाणार. संजय राऊतांना मी पहिल्या दिवसापासून शंभर वेळा उत्तर दिलंय. पुण्यातील जम्बो कोरोना हॉस्पिटल चा घोटाळा हा संजय राऊतांच्या पार्टनरची कंपनी अस्तित्वात नव्हती. अजित पवार का खोटं बोलतायेत. आता म्हणतायेत सोमय्या चंद्रावर गेले होते का?  मग तो चंद्रावरचा फोटो तर दाखवा. असे सांगत सोमय्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे, 


माझा 'त्या' प्रकरणाशी दमडीचा संबंध नाही
माझी पत्रकार परिषद ही माझी आहे. मी त्यांच्या पत्रकार परिषदेची उत्तरं का देऊ? कारण माझा त्या प्रकरणाशी दमडीचा संबंध नाही. राकेश वाधवान आणि माझा संबंध नाही. तीन हजार एकशे पानी पत्र लिहिल्याने तो पुरावा म्हणायचं का? त्या पत्राची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सुद्धा दखल घेतली नाही. वाधवानचा माझा दूर दूर पर्यंत संबंध नाही, हे मी अनेकदा सांगतोय, आता मी त्यावर उत्तर दिलं नाही, असं म्हणू नका


पुढचं टार्गेट कोण?
आता तुमचा पुढचा टार्गेट कोण? असा प्रश्न पत्रकारांनी सोमय्यांना विचारला असता त्यांनी माफियागिरी करणारे घोटाळेबाज, जनतेच्या जीवाशी कोरोना काळात खेळतात ते आमचे टार्गेट आहे असे सांगितले


जितेंद्र नवलानी आठवत नाहीत, माझा त्यांच्याशी संबंध नाही.


संजय राऊतांच्या आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी काही कागदपत्र सादर केलीच, शिवाय त्यांनी एक नाव प्रामुख्याने अधोरेखित केलं. ते नाव म्हणजे जितेंद्र चंद्रलाल नवलानी यांचं. राऊतांनी यापूर्वी 15 फेब्रुवारी शिवसेना भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेतही नवलानी (Jitendra Navlani)यांचं नाव घेतलं होतं. आज त्यांनी नवलानी यांच्या कंपन्याचा उल्लेख करत त्यांच्यावर घणाघाती आरोप केले. "जितेंद्र चंद्रलाल नवलानी हा ईडीचं रॅकेट चालवतो आहे. हा ईडीचा वरिष्ठ अधिकारी आहे. यांनी 100 पेक्षा जास्त बांधकाम व्यवसायिकांकडून खंडणी घेतली आहे", असा आरोप संजय राऊत यांनी केला. यावेळी संजय राऊत यांनी ईडीकडून महाराष्ट्रात झालेल्या कारवाईचे दाखले दिले. यावर सोमय्यांनी जितेंद्र नवलानी आठवत नाहीत, माझा त्यांच्याशी संबंध नाही. असे सांगत राऊतांच्या आरोपाला स्पष्ट नकार दिला.


संजय राऊत यांनी आरोप केलेले जितेंद्र नवलानी कोण आहेत? 



  • जितेंद्र नवलानी हे अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीचे वसुली अधिकारी म्हणून काम करतआहेत

  • संजय राऊत यांच्या दाव्यानुसार त्यांना सध्या दिल्लीत पदोन्नती मिळली आहे

  • राऊत यांच्या दाव्यानुसार जितेंद्र नवलानी हे 7 कंपन्याचे संचालक आहेत

  • राऊतांच्या आरोपानुसार, या सात कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या बिल्डर्सनी शेकडो कोटी रुपये ट्रान्सफर केले

  • नोव्हेंबर 2021 मध्ये आयकर विभागाने नवलानी आणि त्यांच्या पत्नीला बेनामी संपत्तीप्रकरणी नोटीस पाठवली होती

  • बोनान्झा फॅशन मर्चंट या कंपनीत बेनामी आणि बेहिशेबी व्यवहारप्रकरणी आयटीने नोटीस पाठवली होती

  • यानुसार आयकर विभागाने चौकशी केल्यानंतर, उत्पन्नाचा स्त्रोत बनावट असल्याचं समोर आलं होतं


संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे 



  • संजय राऊत यांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद

  • संजय राऊतांचं ईडी अधिकाऱ्यांविरोधात पंतप्रधानांना पत्र

  • या पत्रात ईडीच्या अधिका-यांनी कशी आणि किती जणांकडून वसूली केली आहे याची माहिती दिली आहे

  • आयटीची राज्यात भानामती सुरू आहे

  • जोपर्यंत पालिकेच्या निवडणुका होत नाहीत तो पर्यंत प्रत्येक वॉर्ड मध्ये हे सुरू रहाणार

  • हेच त्यांच्या हातात राहिलं आहे. जिथे जिथे शिवसेनेचा कार्यकर्ता आहे शिवसेनेच्या शाखा आहेत तिथे धाड सुरू आहेत.

  • देशात सिलेक्टेड लोकांना टार्गेट का केलं जातय

  • सरकार पाडण्याचा हा डाव आहे. सरकावर डबाव आणण्याचं काम सुरू आहे

  • आयटी आणि ईडीला आम्ही आतापर्यंत पुराव्यासह 50 नावं दिली आहेत. आणि याचा उल्लेख सासत्याने मी केला आहे

  • त्या लोकांबाबत केंद्रीय तपास यंत्रणा का काही करत नाही.

  • किरीट सोमय्यांनी 100 बोगस कंपन्यांची नावं दिली आहेत. त्यात कोणी ढवंगाळे नावाची व्यक्ती आहे

  • देशात सर्वात जास्त ईडीच्या कारवाई महाराष्ट्रात झाल्या आहेत.

  • महाविकास आघाडीच्या आतापर्यंत 14 नेत्यांवर कारवाई झाल्यात तर पश्चिम बंगाल मध्ये 7 जणांवर झाल्यात

  • ही भानामती कोण आहे जी या रेडस कंट्रोल करतय. शिवसेना या नावाचा लवकरच खुलासा करणार आहे.

  • मागच्या पत्रकार परिषदेत मी एक नाव घेतलं होतं. जो बुलंदशहरात दुध विकायचा गेल्या काही वर्षात त्याची संपत्ता 8 हजार कोटीवर गेलीये

  • त्याला रहायला घर नव्हत आता तो मलबार हिल मध्ये रहातो

  • ईडीने अशा लोकांकडे पहाण्यासाठी कोणता चष्मा लावलाय त्या चष्म्याने आमच्याकडे सुद्धा पहावे

  • भाजपच्या कोणत्या नेत्याचे कोणाकडे किती पैसे आहेत. हे मी पुराव्यासह देतो

  • काही अधिकारी उत्तर प्रदेश मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडणुक लढतायत.

  • त्यातल्या एका उमेदवाराने उत्तर प्रदेश मध्ये भाजपच्या 50 उमेदवारांचा खर्च केल्याची माहिती आहे

  • ईडी भाजपती एटीएम मशीन झाली आहे

  • मी पंतप्रधांना 13 पानांचं पत्र लिहलं आहे 28 फेब्रुवारीला हे पत्र मी त्यांना लिहलं आहे

  • ज्या ईडीला पंतप्रधानांनी आपल्या राजकीय विरोधकां विरोधात ईडीला जागवलं आहे ते काय करतायत

  • मी पंतप्रधानाना लिहलेलं हे पत्र एक भाग आहे. असे 10 पत्र मी पंतप्रधानांना लिहणार आहे.

  • जितेंद्र चंद्रलाल नवलानी हा ईडीचं रॅकेट चालवतो आहे. हा ईडीचा वरिष्ठ अधिकारी आहे

  • यानी 100 पेक्षा जास्त बांधकाम व्यवसायिकांकडून खंडणी घेतली आहे

  • ईडीने दिवान हाऊसिंग फायनान्सचा तपास सुरू केला. अचानक दिवान कडून या अधिकाऱ्यांच्या नावावर 25 कोटी ट्रान्सपर केले गेले

  • अशा अनेक कंपन्या आहेत. ज्यांचा तपास सुरू झाला कि नवनालीच्या सात कंपन्यामध्ये संबंधीत कंपनीकडून करोडो रूपये ट्रान्सपर केले जातात

  • नवलानी कोण आहे. त्यांचा किरट सोमय्याशी काय संबंध आहे. जे ईडीचे प्रमुख अधिकारी आहेत.

  • है सर्व पैसे दिल्ली मुंबईत बसलेल्या ईडी अधिकाऱ्यांसाठी ट्रान्सपर केले जातायत

  • या पैशातून परदेशात संपत्ती खरेदी केली जातीये.

  • यात महाराष्ट्र भाजपच्या काही नेत्यांचा समावेश आहे

  • आज आम्ही जितेंद्र नवनाली आणि रॅकेट विरोधात खंडणीची तक्रार दाखल करणार आहोत

  • या प्रकरण्याच्या चौकशीनंतर ईडीचे काही अधिकारी तुरूगांत जाणार आहेत