Ramdas Athawale Exclusive : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यात काल एक बैठक पार पडली. मुंबईच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये या दोघांमध्ये युतीच्या अनुषंगाने पहिली बैठक झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली होती. यावर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान, त्या' युतीत भीमशक्ती नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) दिली आहे. एबीपी माझाने घेतलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत रामदास आठवलेंनी आपलं मत मांडलंय. 



'दुसऱ्या शिवशक्ती आणि भीमशक्तीचा विषयच येत नाही' - रामदास आठवले
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांच्या युतीवर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, त्या' युतीत भीमशक्ती नाही, आंबेडकरांची शक्ती ही 'वंचित शक्ती' आहे. 'एकनाथ शिंदे यांची खरी शिवशक्ती' असंही ते म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे एकत्र येण्याच्या मुद्द्यावर 'त्या' शक्तीला मी भीमशक्ती मानत नाही. कारण, सगळी शक्ती माझ्याबरोबर असून, ती वंचित शक्ती आहे. 2011 मध्ये बाळासाहेबांनी हाक दिल्यानंतर मी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. आज मी भाजपसोबत आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. यामुळे शिवशक्ती आणि भीमशक्ती याठिकाणी आहे. दुसऱ्या शिवशक्ती आणि भीमशक्तीचा विषयच येत नाही, असे रामदास आठवले यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं.


 


प्रकाश आंबेडकर जर उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले तर....


उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांची युती झाली, आणि प्रकाश आंबेडकर जरी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गेले. तरी आमच्या राजकारणावर फारसा फरक पडणार नाही. कारण दलित समाज हा मोठ्याप्रमाणात माझ्याबरोबर आहे. मी रिपब्लिकन पक्षाचे नाव टिकवून ठेवलं आहे. राजकारणात एकट्या पक्षाला निवडून येत नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीबरोबर जाणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही रामदास आठवले यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलंय.


प्रकाश आंबेडकरांना 'ही' ऑफर कायम 


एबीपी माझाच्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत आठवले म्हणाले की, अजूनही माझ्याकडून प्रकाश आंबेडकरांना ऑफर कायम आहे. त्यांनी माझ्या पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं. कारण एक विचार, एक पक्ष ही काळाची गरज असून बाबासाहेबांचा पक्ष जिवंत ठेवणं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.


'याचा परिणाम शिंदे-फडणवीस सरकारवर होणार नाही' - शंभूराज देसाई


प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या युतीसंदर्भात शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कुणी कुणाबरोबर यावं. हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. याचा कुठलाही परिणाम शिंदे-फडणवीस सरकारवर होणार नाही. अनेक दलित संघटना आमच्याबरोबर यायला तयार आहेत.


'मतदार कुणाच्या सांगण्यावर जात नाही' - चंद्रशेखर बावनकुळे
या युतीसंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ज्याला वाटतं हा पक्ष आमच्या हिताचा आहे. त्यांना मतदान होतं. मागासवर्गीय मतं कुणाला जाणार, असं कुणी सांगत असेल, तर तसं होत नाही. मतदार कुणाच्या सांगण्यावर जात नाही. जनतेची काम करणाऱ्या व्यक्तीच्या मागे मत येतात.


 


 



 


इतर महत्वाच्या बातम्या


Mahaparinirvan Din : इंदू मिलमधील स्मारक लवकर पूर्ण होईल, महापरिनिर्वाण दिनी मुख्यमंत्र्यांची ग्वाही