Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेतील राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण मत देतील अशी आशा नाही असं म्हटलंय. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगलीय. आणखी काय म्हणाले खडसे?


भाजपाचे अनेक आमदार माझ्या संपर्कात, पण...
भाजपामध्ये माझे अनेक समर्थक आहेत. काहींना तिकीट देण्यासाठी मी मदत ही केली आहे. मंत्रीमंडळात स्थान देण्यासाठी ही मदत केली आहे. भाजपामध्ये बरेच जण माझ्याशी मनापासून प्रेम करणारे आहेत. मात्र ते पक्ष सोडून मला मतदान करतील असं वाटतं नाही. परंतु काही लोक माझ्या संपर्कात आहेत. परंतु त्यांनी मला मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली नसल्याचं सांगितलं आहे. भाजपाची भूमिका ही केवळ एकनाथ खडसे पडले पाहिजे अशी नाही, तर महाविकास आघाडीचे उमेदवार पडले पाहिजे अशी असल्याच खडसे यांनी यावेळी व्यक्त केलं 


..त्यामुळे मी ठाकूरांकडे मतांसाठी विनंती करण्यासाठी आलो होतो - खडसे
विधानपरिषदेतील राष्ट्रवादीचे उमेदवार एकनाथ खडसे यांनी काल बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी एक तास ही चर्चा चालली. यावेळी मी अप्पाकडे मतं मागायला आलो होतो. त्यांना विनंती केल्याच त्यांनी मान्य केलं. दुपारी सव्वा तीन वाजता हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली होती आणि सव्वा चार वाजता ते निघाले. यावेळी खडसे यांनी उमेदवार म्हणून मत मागणं आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे मी ठाकूरांकडे मतांसाठी विनंती करण्यासाठी आलो होतो. यावेळी शेतीविषयी चर्चा झाली, त्यांना खजूर भेट म्हणून दिलं. आमचे 32 वर्षापासूनचे कौटुंबिक संबंध आहेत. ठाकूर योग्य तो निर्णय घेतीलं असं सांगितलं असं खडसे यावेळी म्हणाले.  


विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान


विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे.  राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपनं या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केलाय. या निवडणुकीतही 1996, 2010 सारखी विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाची परंपरा पहायला मिळणार काय याची उत्सुकता दिसून येतेय. 


महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती?


विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याचं दिसून येत आहे.