Narayan Rane : शिवसेनेत (Shivsena) फूट पडत असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता दुसरीकडे आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. आणि राजकीय घडामोडींना वेग आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वतःही शिवसेनेतून बाहेर पडलेले नेते आहेत. त्यानंतर एकनाथ शिंदे याचंच बंड शिवसेनेतील सर्वात मोठं मानलं जातंय. तसंच स्वतः शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्याने शिवसेनेतून आता बाहेर पडत असलेल्या नेत्याचं कौतुक राणेंनी केलंय. सध्या शिवसेनेत खळबळ उडाली असताना अशातच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरूवात झालीय. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी सूचक ट्वीट करत मोठे वक्तव्य केले आहे. यावरून आता तर्कवितर्क सुरू झाले आहेत. नेमके काय म्हणाले नारायण राणे?


...नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता - राणे


विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे.  शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे वृत्त होते. त्यातच आता त्यांचे समर्थक समजले जाणारे अनेक आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आलीय. यावर नारायण राणेंनी एक ट्वीट करत म्हटलंय की, "शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता..."


 






 


नारायण राणे एकेकाळी शिवसेनेचे निष्ठावान नेते


नारायण राणे हे एकेकाळी शिवसेनेचे निष्ठावान नेते होते. शाखाप्रमुख, नगरसेवक, तीन वर्षे बेस्ट समितीचे अध्यक्षपद, मंत्रीपद आणि नंतर थेट मुख्यमंत्रिपद असा राणेंच्या कारकिर्दीचा चढता आलेख होता.असं म्हटलं जात होतं, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत मर्जीतील नेते म्हणून नारायण राणे ओळखले जायचे. 1999 साली बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशींना हटवून नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदी नेमण्याचा निर्णय घेतला. युती सरकारच्या शेवटच्या टप्प्यात मनोहर जोशींना गैरव्यवहारांच्या आरोपांचा सामना करावा लागला. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी जोशींचा राजीनामा घेतला आणि नारायण राणे मुख्यमंत्री झाले. अवघ्या नऊ महिन्यांसाठी नारायण राणे मुख्यमंत्री बनले. असं म्हटलं जातं की, याच काळात बाळासाहेब ठाकरेंनी आपला उत्तराधिकारी म्हणून शिवसेना कार्याध्यक्षपदी उद्धव ठाकरेंची निवड केली आणि नारायण राणे दुखावले गेले. दरम्यान, 1999 साली उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची नावं आम्हाला अंधारात ठेवून परस्पर बदलली असा आरोप नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रातून केला आहे. स्वतः शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्याने शिवसेनेतून आता बाहेर पडत असलेल्या नेत्याचं कौतुक राणेंनी केलंय. 


...आणि नारायण राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली
नारायण राणेंनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करूनही त्यांना पक्षात सबुरीने काम घेता आलं नाही. असं म्हटलं जातं की, त्यांच्या स्वभावामुळे अनेक लोक दुखावले. मुलांना राजकारणात आणण्यासाठीही त्यांच्यापासून अनेक लोक दुरावले.


काँग्रेसवर टीका


पुण्यात आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर असल्याच्या प्रश्नावर नारायण राणे यांनी सूचक वक्तव्य केले. त्यांनी म्हटले की, ते कुठं आहेत याबाबत असं काही सांगावं लागत नाही. त्यांच्या नॉट रिचेबल असण्याला काय अर्थ आहे, असा उलट प्रश्न त्यांनी केला. यावेळी नारायण राणे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसचं राहिलं काय असा प्रश्न करत राज्यात आणि देशात पक्ष संपत चालला असल्याचे त्यांनी म्हटले. विधान परिषद निवडणुकीत आमदारांवर अंकुश नसल्याने पराभव झाला असल्याचे राणे म्हणाले.


एकनाथ शिंदेंचं 'स्पेशल 25


विधान परिषद निवडणुकीच्या निकालाबरोबरच राज्यात राजकीय भूकंप झाला. शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे पक्षाच्या 25 पेक्षा जास्त गटासह सूरतमध्ये मुक्कामाला आहेत. शिंदे थेट भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आल्यानं महाविकास आघाडीचं सरकारच अडचणीत येणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर शिवसेनेत भूकंप झाला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली. एकनाथ शिंदे 25 आमदारांसह रात्री उशिरा सूरतच्या ल मेरिडियन हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथं त्यांची भाजप नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे यानंतर होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे आता लक्ष लागलं आहे. 


नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे गुजरातच्या मेरिडियन हॉटेलमध्ये असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. कालच्या निकालानंतर एकनाथ शिंदे आणि गट नॉट रिचेबल आहेत. महत्त्वाची माहिती म्हणजे, काल एकनाथ शिंदे आणि गुजरातच्या काही मोठ्या नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठकही पार पडल्याची माहिची मिळत आहे. त्यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. अशातच राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप होणार असून या भूकंपाचं केंद्र गुजरात तर नाही? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


 


संबंधित बातम्या


Narayan Rane On Shivsena : शिवसेना नेते एकनाथ शिंदे नॉटरिचेबल; नारायण राणे यांनी केले सूचक वक्तव्य, म्हणाले...


Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं 'स्पेशल 25'; नॉट रिचेबल एकनाथ शिंदे आमदारांसह सूरतमध्ये नेमके पोहोचले कसे?