Devendra Fadnavis : भाजप (BJP) मित्रपक्षाला हळूहळू संपवतो, असा हल्लाबोल  राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी केला. यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शरद पवारांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलंय, ते म्हणाले, शरद पवारांचं दु;ख वेगळं आहे. भारतीय जनता पक्ष का कधीही मित्रपक्षांना धोका देत नाही. आम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलंय. 


...त्यामुळे खरी शिवसेना आमच्या सोबत आहे.


बिहारमध्ये आमचे 75 लोकं निवडून आले. आणि जेडीयूचे 42 लोकं निवडून आले, तरीही आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलं. बिहारमध्ये आज नाही, तर उद्या भाजपची सत्ता येईल. त्यामुळे भारतीय जनता पक्ष कधीही मित्रपक्षाला धोका देत नाही. महाराष्ट्रात शिवसेनेनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यामुळे खरी शिवसेना आमच्या सोबत आहे. काल राज्याच्या मंत्रीमंडळाची स्थापना झाली. शिवसेनेचे 9 आणि भारतीय जनता पक्षाचे 9 मंत्री असा शपथविधी पार पडला. त्यामुळे शरद पवारांचं दु;ख वेगळं आहे असं फडणवीस म्हणाले.


काय म्हणाले होते शरद पवार?


"भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो," असा आरोप शरद पवार केला. महाराष्ट्रातील शिवसेना (Shiv Sena) आणि बिहारमधील जेडीयूकडे (JDU) बोट दाखवत शरद पवार यांनी हल्लाबोल केला. शरद पवार यांच्या या वक्तव्याला भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी (Sushil Kumar Modi) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) यांच्या वक्तव्यांची पार्श्वभूमी आहे.  प्रादेशिक पक्षांना भवितव्य नाही, ते शिल्लक राहणार नाहीत आणि आमचा एकच भाजप हा पक्ष देशामध्ये शिल्लक राहील. नितीश कुमारांची तक्रार आहे तीच अकाली दलाची आणि इतर मित्र पक्षांची आहे. भाजप त्यांच्यासोबत असलेल्या मित्रपक्षाला हळूहळू संपवतो. शिवसेना-भाजप एकत्र होते. शिवसेनेत फूट कशी पाडता येईल, अशी परिस्थिती निर्माण केली आणि मित्रपक्षाने शिवसेनेवर आघात केला. 


सुशील मोदी यांनी महाराष्ट्र आणि शिवसेनेचं उदाहरण दिलं.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी भाजपवर अनेक आरोप करत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यावर सुशील मोदी यांनी महाराष्ट्र आणि शिवसेनेचं उदाहरण दिलं. त्यांनी म्हटलं होतं की, "आम्ही कोणताही मित्रपक्ष तोडत नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांना आम्ही तोडले आहे. जसे की महाराष्ट्र. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला आणि त्याचे परिणाम भोगावे लागले."