Diwali Padwa Bhaubeej : आज भाऊबीज, भाऊबहिणीच्या नात्याचा उत्सव. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर आज हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. सर्वसामान्यांपासून राजकीय नेत्यापर्यंत सर्वजण भाऊबीज साजरी करत आहे. औरंगाबादमध्ये केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या घरीही भाऊबीज साजरी करण्यात आली. आज पाडवा आणि भाऊबीज दोन्ही सण एकाच दिवशी आलेत. आधी पाडवा असल्यानं डॉक्टर भागवत कराड यांच्या पत्नी डॉक्टर अंजली कराड यांनी आधी ओवाळलं. त्यानंतर कराड यांच्या भगिनी डॉक्टर उज्ज्वला दहिफळे आणि दीपाताई गीते यांनी भाऊबीजेची ओवाळणी केली. सत्तांतरनाट्यापासून चर्चेत असलेले शिंदे समर्थक आमदार शहाजीबापू पाटील यांच्या घरीही आज पाडवा आणि भाऊबीज साजरी करण्यात आली. शहाजीबापू पाटील यांच्या चिकमहूदमधल्या घरी भाऊबीज आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. थोरल्या बहिणीनं शहाजीबापूंना औक्षण करून दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या... त्यानंतर गावातील महिलांनीही भाऊबीजेनिमित्त शहाजीबापूंना औक्षण केलं. आज पाडवा आणि भाऊबीज असल्यामुळे संध्याकाळी पवार कुटुंबियांची भाऊबीज होणार आहे.  
 
किशोरी पेडणेकर यांची भाऊबीज -
लग्न झालं तेव्हा सख्खे चुलत कुणीही भाऊ आले नाहीत. त्यामुळं आमच्या चाळीत हनुमानाचं मंदिर होतं.. तो माझा पाठीराखा आहे.. तो चिरंजिवी आहे, भाऊ म्हणून मी तुझा स्विकार केलाय, तू ही माझा स्वीकार कर रक्षा कर... मी आव आणत नाही हनुमानाच्या भक्तीचा, असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.  राणा माझा भाऊ कधीही नव्हता... किरीट माझा भाऊ आहे... त्यांनी पक्षाचं काम चोख केलं. संजय राऊत कोठडीत जरी असले तरी दरवर्षीप्रमाणे जाणार, घरी जात कुटुंबियांची भेट घेणार, असेही पेडणेकर म्हणाल्या. 


राज्यमंत्री भारती पवार यांनी भावाचं केलं औक्षण-
कोरोनाच्या दोन वर्षांनंतर दिवाळी साजरी होत असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार या खास भाऊबीज निमित्त नाशिकला दाखल झाल्या आहेत. आपल्या गंगापूर रोडवरील घरी भाऊरायाला औक्षण करत त्याच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थना केली. दोन वर्ष कोरोनामुळे दिवाळी मी साजरी करू शकले नव्हते, आरोग्य विभागाची मोठी जबाबदारी होती मात्र यंदा कुटुंबासमवेत हे दिवस घालवण्यात आनंद मिळत असल्याची भावना त्यांनी एबीपी माझाशी बोलतांना व्यक्त केलीय.


कांचन नितीन गडकरी यांनी भावाचं केलं औक्षण-
ज भाऊबीज आहे. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा प्रतीक असलेला हा सण. या भाऊबीज निमित्य मिसेस कांचन नितीन गडकरी या देखील आपल्या माहेरी आल्या आहे. मुळचे रामटेकचा तोतडे परिवार हा कांचन गडकरी यांचा माहेर आहे. माहेरी आल्यानंतर किती आनंद येतो, माहेरच्या आठवणी, दिवाळीच्या आठवणी, नितीनजीचा आवडता फराळ या सर्व विषयावर कांचन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली. माहेरी येण्याचा आनंद वेगळा असतो, माहेरचे सर्व माझी वाट पाहत असतात.  दिवाळी फराळात नितीनजी यांना भेळ पड्डी चाट, संभारवडी आवडते. या दिवाळीत नितीनजी यांनी मला डायमंड रिंग गिफ्ट दिले. नातवांचे हट्ट नितीनजी पूर्ण करतात. नितीनजी यांना शॉपिंग करणे आवडते. नितीनजी माझ्या माहेरी माझ्या तक्रारी करतात पण त्या गोड तक्रारी असतात. भाऊ माझ्यापेक्षा लहान असल्याने त्याच्यावर विशेष प्रेम आहे, असे कांचन गडकरी म्हणाल्या. 


माजीमंत्री आमदार डॉ. अशोक उईके यांनी कोलामपोडावर साजरी केली भाऊबीज
यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील सखी कोलाम पोडावर माजी मंत्री आमदार अशोक उईके यांनी भाऊबीज साजरी केली. यावेळी परिसरातील महिला सरपंचांनी उईके यांना औक्षवन करून ओवाळणी केली. आदिवासी समाज पारंपारीक पद्धतीने आपली संस्कृती जपत दिवाळी साजरी करतात. त्यामुळे पारंपरिक दंडार नृत्य यावेळी आदिवासी बांधवांनी सादर केले. आदिवासी विकास प्रकल्प विभागाच्या योजना दुर्गम भागात पोहोचविणाऱ्या ग्रामसाथी व सरपंचांना राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांच्या प्रतिमा भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच आदिवासी बांधवांना फराळ व भेटवस्तू वितरित करण्यात आल्या. आदिवासींचे जीवनमान उंचवावे याकरिता पोडांचा विकास करावा अशी मागणी महिलांनी आमदार उईके यांचेकडे केली.


राजन साळवी यांचं बहिणीनं केलं औक्षण -
 उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे  राजापूर - लांजा मतदार संघाचे  आमदार राजन साळवी भाऊबीज साजरी केली. शामल संजय शेठ ही राजन साळवी यांची मानलेली बहीण असून साळवी यांनी यावेळी भाऊबीज साजरी केली. मागील 36 वर्षापासून राजन साळवी या आपल्या मानलेल्या बहिणीकडे न चुकता येतात.