मुंबई: एकीकडे शिवसेनेचा एकनिष्ठ नेता एकनाथ शिंदे तर दुसरीकडे पक्षप्रमुख तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असा पेच निर्माण झाला असताना हा पेचच मुळात शिवसेनेने निर्माण केल्याची धक्कादायक बाब सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. शिवाय शिंदे यांच्या बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हात असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे खरच शिंदे यांच्या बंडाची स्क्रिप्ट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिली तर नसावी अशी जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळते आहे.


छगन भुजबळ यांच्यानंतर जवळपास तीस वर्षांनंतर शिवसेनेतील एखाद्या नेत्याने बंड केले. गेल्या दोन दिवसांपासून टीव्ही चॅनल, वृत्तपत्रे, सोशल मीडिया आदींवर फक्त फक्त एकनाथ शिंदे आणि शिवसेना अशी दोनच नावे झळकू लागली आहेत. याला कारण काय तर? कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरुद्ध बंडाळी केली. 


एकीकडे राज्यात हे महानाट्य सुरू असताना सोशल मीडियावर मात्र भलत्याच चर्चाना उधाण आले आहे. ते म्हणजे शिंदेच्या बंडाची स्क्रिप्ट खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहल्याचे. कारण असे जर नसेल तर एकावेळी 42 आमदार शिंदे सोबत जाणे शक्यच नसल्याचे बोलले जात आहे. मागील अडीच वर्षाचा कार्यकाळ पाहता शिवसेनेच्या काही आमदारांचा काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्यास सुरवातीपासून विरोध होता. तर दुसरीकडे मागच्या पाच वर्षात भाजप ने देखील शिवसेनेला बराच त्रास दिला, असे म्हणणारे आमदारही शिवसेनेत होते. मग अशावेळी भाजप सोबत सरकार स्थापन करण्यासाठी शिंदे सोबत एवढे आमदार कसे तयार झाले, हा प्रश्नही यावेळी उपस्थित होतो. येत्या एक दोन दिवसांत या प्रश्नाचेही उत्तर मिळेल, तोपर्यंत नेमक्या काय घडामोडी होतायेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.




हे प्रश्न झाले उपस्थित
विशेष म्हणजे सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या एका महत्त्वाच्या मंत्र्यांनी केलेले बंड.
तसेच शिवसेनेचे जवळपास 42 आमदार एकनाथ शिंदे सोबत. यामध्ये गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड यांसारखे अनेक महत्वाचे नेते या बंडात सामिल.
एकनाथ शिंदेने केलेल्या बंडाची कुणकुण पक्ष श्रेष्ठींना कशी लागली नाही. महत्त्वाच म्हणजे वर्षानुवर्ष शिवसेना पक्षाशी अत्यंत निष्ठावंत राहिलेले आमदार या बंडखोरीत समाविष्ट आहेत. 


अनेक मंत्र्यांचा सूर
कालही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या झालेल्या बैठकीनंतर या बंडखोरीमागे शिवसेनेच्या एखाद्या मोठ्या मंत्र्याचा हात असल्याचे सुर काही मंत्र्यांच्या तोंडून उमटले. पक्षातील एवढे आमदार गुजरातला निघून जातात आणि त्याची पक्षाला माहिती होत नाही, असं होणं अशक्य आहे अशी प्रतिक्रिया देखील उमटली आहे.