Maharashtra Supreme Court Hearing Live : शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा, निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती नाही
Maharashtra Political Crisis Live : कोर्टाच्या निकालापूर्वीच निवडणूक आयोगाला सत्तासंघर्षावर निर्णय घेता येणार का? आज घटनापीठासमोर होणाऱ्या सुनावणीत उत्तर मिळण्याची शक्यता
Maharashtra Politics : आयोगाची लढाई जिंकण्यासाठी आमची लढाई पूर्ण झाल्याची माहिती शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी दिली आहे.
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिल्यानंतर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी या पुढे देखील सुप्रिम कोर्टात केस सुरू राहणार असल्याची माहिती दिली.
Maharashtra Politics : शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीवर स्थगिती देण्यास कोर्टाने नकार दिलाय. त्यामुळे ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जातोय.
पक्षाचा व्हिप न पाळल्याने आमदार अपात्र आहेत. शिवाय एकनाथ शिंदे पक्षातच नाही मग निवडणूक आगोय त्यांचं म्हणंणं कसं ऐकणार असा प्रश्न कपिल सिब्बल यांनी कोर्टात उपस्थित केलाय.
19 जुलै पूर्वीच एकनाथ शिंदे यांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षाचं प्रथामिक सदस्यत्व देखील नाही, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यानी केलाय.
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडलं. त्यांनी पक्ष सोडून विरोधी पक्षासोबत युती केली, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी कोर्टात केलाय.
Maharashtra Politics : पक्षांतर्गत फूट पहिल्यांदा पडलेली नाही. अशा फूटीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, असा युक्तिवाद निवडणूक आयोगाचे वकील दातार यांनी केलाय.
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाला त्यांचं काम करू दिलं पाहिजे, अशी बाजू राज्यपालांचे वकील तुषार मेहता यांनी कोर्टात मांडली आहे.
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यनांतर आयोगाचे अधिकार आणि अपात्रतेचा संबंध उरला नाही, असा युक्तीवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी कोर्टासमोर केलाय.
Maharashtra Politics : ठाकरे गट फुटीचा केवळ विधिमंडळ पक्षापुरताच विचार करत आहे; शिंदे गटाकडून नीरज कौल यांचा युक्तिवाद
Maharashtra Politics : पक्षसदस्य म्हणून आयोगाकडे जाण्याचा आम्हाला अधिकार, खरी शिवसेना कोणती? हा निर्णय आयोगाला घ्यायचाय; शिंदे गटाकडून नीरज कौल यांचा युक्तिवाद
Maharashtra Politics : लंच ब्रेकनंतर सुप्रीम कोर्टाचं कामकाज सुरू
Supreme Court Hearing Live : विधीमंडळात काय घडतं, यातूनच सर्व संघर्ष उभा राहतो, तो संघर्ष नसता तर इतर घटना टळल्या असल्या; कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी
Supreme Court Hearing Live : पक्षातून नव्हे पदावरुन काढल्याची माहिती दिलेली; न्यायालयाच्या प्रश्नाला ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल यांची माहिती
Supreme Court Hearing Live : दहाव्या सूचीनुसार, पक्षात विलीन होणं हा एकमेव पर्याय; ठाकरे गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांचा कोर्टात युक्तिवाद
शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
- निवडणूक आयोगाच्या मूळ मुद्द्याचा विचार व्हावा
- 29जूनला पक्षाने शिंदे गटाला अपात्र ठरवलं
- 29 जूनला सुप्रीम कोर्टाची अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती
- 29 जूननंतर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी
- सिब्बल यांच्याकडून शिंदे गटाच्या बंडाचा घटनाक्रम सादर
- 20 जूनला सर्व घडामोडी सुरु
- शिंदे गट 19 जुलैला आयोगात गेलं, त्यामुळे त्यापूर्वीच्या घटनाही तितक्याच महत्त्वाच्या
- आधीचे प्रश्न निकाली निघणं गरजेचं
- 29 जूननंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी, मग आयोगात जाण्यासाठी इतका उशीर कसा झाला
- ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांच्याच अपात्रतेचा मुद्दा प्रलंबित आहे. त्यामुळे तो मुद्दा आधी महत्त्वाचा
- शिंदे गट कोणत्या अधिकारात आयोगात गेलं, आमदार म्हणून की पक्ष म्हणून - कोर्टाची विचारणा, सिब्बल म्हणाले हाच तर कळीचा मुद्दा.. त्यांचा आमदारकीचाच प्रश्न आहे.
- शिंदे यांचं सध्याचं स्टेटस काय हाच मूळ प्रश्न - सिब्बल
- शिंदे एका पक्षाचे म्हणून जाऊ शकतात - कोर्ट
- दहाव्या परिशिष्टानुसार फुटीला मान्यता नाही - सिब्बल
Supreme Court Hearing Live : 19 जुलै रोजी शिंदे गटानं निवडणूक आयोगात धाव घेतली, पण शिंदे गटाकडून त्यापूर्वीच पक्ष सदस्यत्वाचा त्याग करण्यात आला होता, पक्षात नसताना निवडणूक आयोगात जाणं कितपत योग्य? सिब्बल यांचा युक्तिवाद
Supreme Court Hearing Live : शिंदे गटाला एखाद्या राजकीय पक्षात विलीन व्हावंच लागेल : कपिल सिब्बल
Maharashtra Political Crisis : शिंदे गट 19 जुलैला निवडणूक आयोगाकडे गेला, निवडणूक आयोगाला 19 जुलैच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागेल; ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
Supreme Court Hearing Live : सुप्रीम कोर्टात विजय आमचाच होणार
घटनेत राजकीय पक्षाची विस्तृत व्याख्या कुठही नाही : कोर्ट
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाकडे शिंदे गटाचा मूळ पक्ष असल्याचा दावा, मात्र पक्षाचं सदस्यत्व आहे की, नाही; हे ठरवणं महत्त्वाचं; ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
Maharashtra Politics : व्हीप धुडकावणाऱ्यांवर राजकीय पक्षाला कारवाईचे अधिकार, ते संबंधित पक्षाचे असतात, अपक्ष नाही; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
#MaharashtraPolitics घटनेत राजकीय पक्षाची विस्तृत व्याख्या कुठेही नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिपण्णी
Supreme Court Hearing Live : फुटीर गट अपात्र ठरला, तर विधिमंडळ सदस्यत्वावर काय परिणाम? अपात्रतेच्या निर्णयाचा पक्षचिन्हाच्या निर्णयावर परिणाम कसा? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाचे सवाल
राजकीय पक्षाचे सदस्य विधिमंडळ पक्षाचे सदस्य असतील, तर ते वेगळा गट स्थापन करु शकत नाही; ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद
Supreme Court Hearing Live : शिंदे गट कोणत्या भूमिकेत आयोगात गेला? विधीमंडळ पक्षाचा सदस्य की, राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून? सर्वोच्च न्यायालयाचा वकिलांना प्रश्न
राजकीय पक्षाचे सदस्य असतील तर आयोगात दाद मागण्याचा हक्क आहे, कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर कोर्टाची टीप्पणी
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे.
Maharashtra Political Crisis Live : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर एकत्र सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी करून स्थापन केलेल्या सरकारचे भवितव्य या याचिकांच्या निकालावर अवलंबून आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांचे हे घटनापीठ असून, यात न्या. एम.आर. शाह, न्या. हिमा कोहली, न्या. नरसिंहा, न्या. कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा,राज्यपाल व विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार, पक्षांतरबंदी कायदा या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर खरी शिवसेना कुणाची याचाही निर्णय उपेक्षित आहे.
Maharashtra Political Crisis Live : शिंदे गटाची याचिका - उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्यासाठी बजावलेल्या नोटीसविरोधात याचिका.
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची याचिका
शिवसेनेची याचिका - विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड होण्याआधी शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्याची नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावली होती, या आमदारांना निलंबित करावे,
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या व्हिपला मान्यता दिली होती, त्याविरोधातील याचिका.
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेले अधिवेशन बेकायदा होते, असा दावा याचिका.
Maharashtra Political Crisis Live : राज्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तापरिवर्तनाबाबत आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण शिवसेना कुणाची?, धनुष्यबाण कुणाचा?, याचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार की केंद्रीय निवडणूक आयोगात याकडे ठाकरे आणि शिंदे गटासह राज्याचं लक्ष लागलंय. सुप्रीम कोर्टात आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर दुसरी सुनावणी होतेय. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आलाय, त्याबाबत आयोगाचं कामकाज चालू राहणार की नाही हे कोर्टात ठरेल. जोपर्यंत सुप्रीम कोर्टातल्या प्रश्नांचा निकाल लागत नाही तोपर्यंत आयोगाकडून निर्णय होऊ नये ही उद्धव ठाकरे गटाची भूमिका आहे. तर आयोगाला यावर निर्णय घेऊ द्यावा अशी शिंदे गटाची मागणी आहे. याशिवाय आमदारांची अपात्रता आणि सरकारच्या वैधतेला दिलेलं आव्हान याबाबतच्या याचिकांवरही सुनावणी अपेक्षित आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Political Crisis Live : राज्यात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सत्तापरिवर्तनाबाबत आज अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण शिवसेना कुणाची?, धनुष्यबाण कुणाचा?, याचा फैसला सुप्रीम कोर्टात होणार की केंद्रीय निवडणूक आयोगात याकडे ठाकरे आणि शिंदे गटासह राज्याचं लक्ष लागलंय. सुप्रीम कोर्टात आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठासमोर दुसरी सुनावणी होतेय. शिवसेना पक्षावर शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जो निवडणूक आयोगात दावा करण्यात आलाय, त्याबाबत आयोगाचं कामकाज चालू राहणार की नाही हे कोर्टात ठरेल. जोपर्यंत सुप्रीम कोर्टातल्या प्रश्नांचा निकाल लागत नाही तोपर्यंत आयोगाकडून निर्णय होऊ नये ही उद्धव ठाकरे गटाची भूमिका आहे. तर आयोगाला यावर निर्णय घेऊ द्यावा अशी शिंदे गटाची मागणी आहे. याशिवाय आमदारांची अपात्रता आणि सरकारच्या वैधतेला दिलेलं आव्हान याबाबतच्या याचिकांवरही सुनावणी अपेक्षित आहे.
राज्य सरकारचे भवितव्य या याचिकांच्या निकालावर अवलंबून
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर एकत्र सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड करून भाजपशी हातमिळवणी करून स्थापन केलेल्या सरकारचे भवितव्य या याचिकांच्या निकालावर अवलंबून आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे ही सुनावणी होणार आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांचे हे घटनापीठ असून, यात न्या. एम.आर. शाह, न्या. हिमा कोहली, न्या. नरसिंहा, न्या. कृष्ण मुरारी यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 12 आमदारांच्या निलंबनाचा मुद्दा,राज्यपाल व विधानसभा उपाध्यक्षांचे अधिकार, पक्षांतरबंदी कायदा या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर खरी शिवसेना कुणाची याचाही निर्णय उपेक्षित आहे.
'या' याचिकांवर होणार सुनावणी
शिंदे गटाची याचिका - उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्यासाठी बजावलेल्या नोटीसविरोधात याचिका.
शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची याचिका
शिवसेनेची याचिका - विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड होण्याआधी शिंदे गटाच्या 16 आमदारांना निलंबित करण्याची नोटीस उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बजावली होती, या आमदारांना निलंबित करावे,
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या व्हिपला मान्यता दिली होती, त्याविरोधातील याचिका.
विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी बोलावलेले अधिवेशन बेकायदा होते, असा दावा याचिका.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -