Maharashtra IPS Transfer: सत्ताबदल झाला की सर्वात आधी आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या बातम्या समोर येतात. राज्यातील महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi Government) सरकार सध्या अडचणीत दिसत आहे. सत्ताबदलाच्या बातम्या येत असतानाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या बातम्या समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पुण्यासह काही ठिकाणी वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि गृहमंत्रालयात चर्चा सुरू आहे.


यात मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील, ठाणे आयुक्त, पुण्यातील आयुक्तांची बदली होऊ शकते अशी चर्चा आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला गृह मंत्रालयाने पाच आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढती आणि बदल्यांवर बंदी घातली होती. या निर्णयाच्या एक दिवस आधी मंत्रालयाने पोलीस दलात मोठे फेरबदल केले होते.


राज्यातील मविआ सरकार वाचवण्यासाठी शुक्रवारी बैठकांच्या फेऱ्या सुरू झाल्या असताना शनिवारीही या बैठकांच्या फेऱ्या सुरूच राहणार आहेत. शिवसेनेने (Shivsena)आज पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेतली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीची चर्चाही जोरात सुरू आहे. आदित्य ठाकरे जाहीर सभा घेणार आहे. तर देवेंद्र फडणवीस आणि रामदास आठवले यांची भेट होणार आहे.


दरम्यान, राज्य महाराष्ट्र सरकारने अनेक निर्णय छुप्या पद्धतीने घेतले असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. गेल्या 4 दिवसांत सरकारने 182 आदेश जारी केले असून त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि उद्धव ठाकरे यांच्यातील खडाजंगीनंतर महाराष्ट्र सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या: