Maharashtra Political Crisis Update : महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या बंडखोर आमदारांविरोधात आणि भाजपविरोधात शिवसैनिकांकडून राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर  बंडखोर आमदारांच्या  मतदार संघात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.


राज्यातील राजकीय पेचप्रसंगामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी गृह खात्याने या सूचना दिल्या आहेत. राज्याच्या गृह विभागाने हाय अलर्टचे आदेश जारी केले आहेत. मुंबई आणि एमएमआरडीए भागात विशेष सूचना देण्याचे आदेश गृहखात्याने दिले आहेत. शिवसैनिकांची बंडखोर आमदारांबाबत आणखी नाराजी वाढण्याची शक्यता लक्षात घेत गृह खात्याकडून आदेश देण्यात आले आहेत. 


 






दरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सतर्क आणि सज्ज  असल्याची माहिती गृहखात्याने ट्विट करत दिली आहे. राज्यात  कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही मोठी अनुचित घटना घडलेली नाही. गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी पुरेशी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आली नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सतर्क आणि सज्ज आहेत. राज्याच्या विविध भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत.  शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशा इशारा गृहखात्याने दिला आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: