Maharashtra Political Crisis : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणखी एक धक्का दिला आहे. ठाकरे सरकारच्या (Thackeray Sarkar) काळात राज्यपाल (Governor Bhagatsingh Koshyari) नियुक्त आमदारांसाठी दिलेली यादी शिंदे सरकारनं मागे घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना ही यादी मागे घेत असल्याचं पत्र दिलं आहे. 


12 नोव्हेंबर 2020 मध्ये ठाकरे सरकारनं 12 नावांची यादी राज्यपालांकडे दिली होती. मात्र राज्यपालांनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. यावरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये वादही समोर आले होते. मात्र दरम्यानच्या काळात सरकार बदलल्यानंतर आता ही यादीच मागे घेण्याचं पत्र शिंदे सरकारनं दिलं आहे.


या 12 जणांची नावं दिली होती...


महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून प्रत्येकी चार-चार अशी 12 जणांची नावं राज्यपाल नियुक्त आमदारीसाठी पाठवण्यात आली होती. यात राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांचं नाव होतं तर काँग्रेसकडून रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसैन आणि अनिरुद्ध वनकर यांचं नाव देण्यात आलं होतं. तर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत रघुवंशी, विजय करंजकर आणि नितीन बानगुडे पाटील यांचं नाव पाठवण्यात आलं होतं. यापैकी एकनाथ खडसे यांची विधानपरिषेदत एन्ट्री झाली आहे तर काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. 


नवं सरकार, नवी समीकरणं; 12 नावं लवकरच राज्यपालांकडे पाठवली जाणार?
शिंदे-फडणवीस सरकारकडून राज्यपाल नियुक्त 12 नावं लवकरच राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. या नावांवर अंतिम चर्चाही झाली असल्याची माहिती आहे.  शिंदे-फडणवीसांकडे 12 नावांसाठी कितीतरी पटीने इच्छुकांची संख्या आहे. या 12 नावांसाठी अनेक नेत्यांनी लॅाबिंग देखील सुरु केली आहे. 


आमदारांचं संख्याबळ पाहता भाजपला 12 पैकी 8 तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. आता या 12 नावांमध्ये नेमकी कोणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न शिंदे आणि फडणवीसांसमोर आहे.  2019 च्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्यांना संधी दिली जाऊ शकते. अनेक नेते असे आहेत, ज्यांची विधानपरिषदेची टर्म संपलेलीही आहे. त्यामुळे अनेक जण लॅाबिंग करत आहेत. शिंदे आणि फडणवीसांवर विश्वास ठेवत पक्षात आलेल्या लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 


शिंदे गटातल्या संभाव्य नावांवर एक नजर टाकूया 
रामदास कदम
विजय शिवतारे 
आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळ 
अर्जुन खोतकर/ नरेश मस्के 
चंद्रकांत रघुवंशी 
राजेश क्षीरसागर 


भाजपच्या संभाव्य नावांवर एक नजर टाकूया 
हर्षवर्धन पाटील
चित्रा वाघ
पंकजा मुंडे
कृपाशंकर सिंग
गणेश हाके
सुधाकर भालेराव


इतर महत्वाच्या बातम्या


नवं सरकार, नवी समीकरणं; राज्यपाल नियुक्त 12 नावांच्या यादीत कोणाचा समावेश?


'घाईघाईने मधुचंद्र केला, पण लग्नच करायचे विसरलो! अशी शिंदे गटाची अवस्था'; शिवसेनेची जोरदार टीका