NCP Leader Jayant Patil On BJP: शिंदे सरकारच्या (Maharashtra News) काळात गुजरातला (Gujrat) उद्योग गेल्यानं कोट्यवधींची गुंतवणूक तर गेलीच, पण हजारो रोजगारही गेल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्यानं केला जात आहे. राज्यातील गुंतवणूक (Investment in State) गेल्याचे, बॅनर्स, फोटो आणि मीम्स सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष (National Congress Party) जयंत पाटील (Jayant Patil) यांनी असाच एक बॅनरचा फोटो ट्वीट करून शिंदे सरकारवर खोचक टीका केली आहे. एका बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांचा फोटो दिसत आहे. त्यावर इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी, गुजरात को देंगे, असं म्हटलं आहे. तर एका बॅनरवर दूध मागोंगे दूध देंगे, तर तिसऱ्या बॅनरवर खीर मांगोंगे खीर देंगे, असं लिहिलं आहे. जयंत पाटलांच्या ट्वीटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 






जयंत पाटलांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तीन बॅनर दिसत आहेत. एका बॅनरमध्ये ब्लिंकइटची जाहीरात असून त्यावर 'दूध मांगोगे दूध देंगे' असं लिहिलं आहे. फोटोतील दुसऱ्या बॅनरमध्ये झोमॅटोची जाहीरात असून त्यावर 'खीर मांगोगे खीर देंगे' असं लिहिलं आहे. तर या दोन बॅनर्सखालीच आणखी एक बॅनर आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहे. त्या बॅनरवर लिहिलंय की, 'इन्व्हेस्टमेंट मांगोगे, यूपी, गुजरात को देंगे'. हा फोटो ट्वीट करत जयंत पाटलांनी एक हटके कॅप्शन दिलं आहे. "फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा!", असं कॅप्शन जयंत पाटलांनी ट्वीट शेअर करताना दिलं आहे. 


दरम्यान, सध्या सोशल मीडियावर ब्लिंक इट आणि झोमॅटोचे हॉर्डिंग्स चर्चेचा विषय बनले आहेत. अनेकजण यासंबंधातील वेगवेगळे मीम्स शेअर करत आहेत. याच ट्रेंडवर स्वार होत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही एक मिम शेअर केलं आहे. तसेच, मीम शेअर करत जयंत पाटलांनी शिंदे-फडणवीस सरकारला चिमटाही काढला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. बऱ्याच ट्रेंड्सला ते फॉलो करतात. त्यातच झोमॅटो आणि ब्लिंक इटच्या ट्रेंडचा वापर करत त्यांनी शिंदे फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


शिवसेनेत दोन गट पाडणं, हे भाजपचंच मिशन; गिरीश महाजनांनी दिली कबुली