Maharashtra Petrol-Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, आज देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. जवळपास गेल्या तीन आठवड्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. तरीही आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. यापूर्वी 6 एप्रिल रोजी पेट्रोल (Petrol Price) -डिझेलच्या दरांत प्रत्येकी 80-80 पैशांची वाढ करण्यात आली होती. अशातच महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज म्हणजेच, आठवड्याच्या पहिल्या दिवशीही राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दरम्यान, काही दिवसांपासून देशातील पेट्रोल-डिझेलचे दर (Diesle Price) स्थिर असले, तरिही राज्यातील अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलनं उच्चांक गाठला आहे.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
शहरं | पेट्रोलचे दर (प्रति लिटर) | डिझेलचे दर (प्रति लिटर) |
मुंबई | 120.51 रुपये | 104.77 रुपये |
पुणे | 120.60 रुपये | 103.28 रुपये |
नाशिक | 120.02 रुपये | 102.73 रुपये |
परभणी | 123.51 रुपये | 106.08 रुपये |
औरंगाबाद | 120.63 रुपये | 103.32 रुपये |
कोल्हापूर | 120.64 रुपये | 103.35 रुपये |
नागपूर | 121.03 रुपये | 103.73 रुपये |
देशातील महानगरांत पेट्रोल-डिझेलच्या किमती काय?
इंडियन ऑईलनं जारी केलेल्या लेटेस्ट दरांनुसार, राष्ट्रीय राजधानीत एक लिटर पेट्रोलची किंमत (Petrol Price) 105.41 रुपये असून डिझेल (Diesel Price) 96.67 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत एक लिटर पेट्रोलसाठी 120.51 रुपये, तर एक लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत.
इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दररोज बदलतात पेट्रोल-डिझेलच्या किमती
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात.
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).