Maharashtra Petrol-Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांनी (Oil Companies) पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) चे आजचे दर जारी केले आहेत. देशात निवडणुका संपल्या असून त्यानंतर इंधन दरवाढीची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु, निवडणूक निकालांनंतरही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. महाराष्ट्राबाबत (Maharashtra) बोलायचं झालं तर, राज्यातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. काल (शुक्रवारी) अर्थमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्येही राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल शंभरीपार पोहोचलं आहे. जाणून घेऊया देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर म्हणून ओळख असलेल्या मुंबईसह (Mumbai) पुणे (Pune), नाशिक (Nashik), नागपूरमधील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर. 

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय? 

प्रमुख शहरं पेट्रोलची किंमत प्रति लिटर डिझेलची किंमत प्रति लिटर
मुंबई 109.98 रुपये प्रति लिटर  94.14 रुपये प्रति लिटर
ठाणे 110.12 रुपये प्रति लिटर  94.28  रुपये प्रति लिटर
पुणे 109.72 रुपये प्रति लिटर  92.50 रुपये प्रति लिटर
नाशिक 109.79 रुपये प्रति लिटर 92.57 रुपये प्रति लिटर
नागपूर 110.10 रुपये प्रति लिटर 92.90 रुपये प्रति लिटर
कोल्हापूर 109.66 रुपये प्रति लिटर  92.48 रुपये प्रति लिटर
अहमदनगर 110.12  रुपये प्रति लिटर  92.90 रुपये प्रति लिटर
अमरावती 111.14 रुपये प्रति लिटर 

93.90 रुपये प्रति लिटर

देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती काय? 

देशात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळाला आहे. बऱ्याच दिवसांपासून देशात निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका उडणार असल्याचं सांगितलं जात होतं. अशातच 10 मार्च रोजी देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. भाजपनं चार राज्यांच आपलं वर्चस्व दाखवलं आहे. तर पंजाबमध्ये आपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. त्यानंतर देशात इंधन दरवाढीचा भडका उडणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण निकालानंतर 3 दिवसांनीही देशातील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. 

128 दिवसांनंतरही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

देश पेट्रोल-डिझेलचे दर 4 नोव्हेबंरपासून स्थिर आहेत. सलग 128 दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल करण्यात आला नाही. देशात जवळपास 4 महिन्यांपासून इंधन दर स्थिर आहेत. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तेजी, देशातही दरवाढ होणार?