Majha MahaKatta with Munde Sisters : भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुडे (Pankaja Munde), खासदार प्रीतम मुंडे (Pritam Munde) आणि यशश्री मुंडे (Yashashri Munde) या मुंडे भगिनी एबीपी माझाच्या माझा महाकट्टा (Majha Maha Katta) या कार्यक्रमामध्ये आल्या होत्या. त्यावेळी या तीनही बहिणींनी मनमोकळ्या गप्पा मारत अनेक गोष्टींचे खुलासे देखील केले आहेत. दरम्यान याचवेळी बालपणी पंकजा मुंडेंनी कोणचा मार खाल्लाय? यावर देखील मुंडे बहिणींनी खुलासा केला.
यावेळी बोलताना प्रीतम मुंडे म्हणाल्यात की, यशश्री मुंडे आणि पंकजा या दोघींमध्ये सर्वाधिक भांडण व्हायचे. तर पंकजा मुंडे म्हणाल्यात, आमची यशश्री लहानपणी खूप गुंडी होती. त्यामुळे मी तिचा मार खाल्ला आहे. आई-बाबांचा देखील कधीच मार खाल्ला नाही. पण जगात कुणाचा मार खाल्ला असेल तर तो फक्त यशश्रीचा मार खाल्लाय असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तर मी आई-बाबांचा मार खाल्ला असून, बाबांनी मला एकदा मारलं होतं असे प्रीतम मुंडे म्हणाल्या.
पंकजा-प्रीतम मुंडेंच्या लग्नात कोण जास्त रडलं?
पंकजा-प्रीतम मुंडेंच्या लग्नात कोण जास्त रडलं? या प्रश्नावर उत्तर देतांना यशश्री मुंडे म्हणाल्यात की, गोपीनाथ मुंडे हेच दोघींच्या लग्नात सर्वात जास्त रडले. विशेष म्हणजे ज्यांचं लग्न होते त्या पंकजा ताई आणि प्रीतम ताई रडल्या नाही पण बाबाच सर्वात जास्त रडले. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांना रडताना पाहून आम्ही सर्व रडायला लागलो असेही यशश्री मुंडे म्हणाल्यात. तर पंकजा मुंडे यांचे लग्न झाले त्यावेळी मी लहान होते. त्यामुळे मला त्यावेळी विशेष असे काही कळत नव्हते. पण माझ्या आईपेक्षा बाबाच खूप इमोशनल होते. तर प्रीतम ताई यांच्या पाठवणीच्या वेळी देखील बाबा खूप रडले असेही यशश्री मुंडे म्हणाल्या.
राजकारण सोडावं असं मला रोज वाटतं
नको असलेल्या गोष्टी अनेक वेळा राजकारणात कराव्या लागतात. मी सत्तेत मंत्री असताना एका महिला आयएएस अधिकाऱ्याविरोधात माझे आमदार एकत्र आले होते. पण त्यावेळी मी त्यांना नाराज करुन त्या महिला अधिकाऱ्याची बाजू घेतली. त्यामुळे विचारांशी तडजोड करुन मी राजकारण करु शकत नाही. म्हणून राजकारण सोडावं असं मला रोज वाटतं, पण दुसऱ्याच क्षणी पुन्हा जिद्दीने उभा राहण्याची शक्ती येते, असे पंकजा मुंडे म्हणाल्यात.
इतर महत्वाच्या बातम्या: