पंढरपूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हातात घेतलेले कल्याणराव काळे यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधायचा निर्णय घेतल्याने पंढरपूर पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा हादरा बसणार आहे . 


कल्याणराव काळे हे पूर्वीपासून विठ्ठल परिवार आणि  भारत भालके यांच्या सोबत होते . या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भारत भालके यांच्या निधनानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असून आपली सर्व ताकद भगीरथ भालके यांच्या मागे उभी करणार आहेत. आज राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे काळे यांच्या फार्म हाऊसवर स्नेह भोजनासाठी जाणार असून कल्याणराव काळे यांनी त्यांना निमंत्रित केले आहे


ही पोटनिवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केल्यानंतर अजित पवार यांनीही जोरदार ताकद लावत भाजपचे मोहरे पुन्हा राष्ट्रवादीकडे वाळण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून कल्याणराव काळे कोणाच्याच स्टेजवर नसल्याने त्यांच्याकडे किंग मेकर म्हणून पहिले जात होते. आता कल्याणराव यांनी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्या मागे उभे राहण्याचा निर्णय घेतल्याने भाजपच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे . 


कल्याणराव काळे यांच्या ताब्यात असलेले साखर कारखाने, बँक व संस्थांमुळे कार्यकर्त्यांचा मोठा फौजफाटा काळे यांच्यामागे आहे.  पंढरपूर शहर व तालुक्यातील 22 गावात त्यांचा प्रबळ गट कार्यरत आहे. दोन दिवसापूर्वी काळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन आपली भूमिका मांडत राष्ट्रवादीच्या मागे जाणार असल्याचे सांगितले होते. आता काळे भगीरथ भालके यांच्या बाजूला गेल्याने एकसंघ विठ्ठल परिवार विरुद्ध परिचारकांचा पांडुरंग परिवार अशी लढत पंढरपूर भागात होणार असून मंगळवेढ्यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे.


संबंधित बातम्या :


Maharashtra Pandharpur Bypolls | पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढणार, 'स्वाभिमानी'सह धनगर समाजाकडूनही अर्ज दाख


पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी, भाजपकडून उमेदवारांची घोषणा; तरुण नेतृत्त्वांवर पक्षश्रेष्ठींचा विश्वास