मुंबई : राज्यात आज ओमायक्रॉन व्हेरियंटच्या 86 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे नागपुरात सापडले असून त्या खालोखाल पुणे शहराचा नंबर आहे. नागपुरात आज ओमायक्रॉनच्या 47 रुग्ण तर पुणे शहरात 28 रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 2845 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1454 रुग्ण हे बरे झाले आहेत. 


राज्यात आज सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी नागपुरात 47, पुणे शहरात 28, पिंपरी चिंडवडमध्ये 3, वर्धा जिल्ह्यात 2 रुग्ण सापडले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक रुग्ण हे पुणे शहरात सापडले असून त्याची संख्या ही 1030 इतकी आहे. त्या खालोखाल मुंबईचा क्रमांक लागत असून ती संख्या 1010 इतकी आहे. 


राज्यात आतापर्यंत 6328 लोकांची ओमायक्रॉन चाचणी करण्यात आली असून त्यापैकी 6223 अहवाल प्राप्त झाले आहेत. 105 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. 


राज्यातील स्थिती 


गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  28 हजार 286  नव्या रुग्णांची भर पडली असून 36 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 21 हजार 941 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.88 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 89 हजार 936 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.09 टक्के आहे.  सध्या राज्यात 14 लाख 35 हजार 141 व्यक्ती होम क्वॉरंटाईन आहेत तर 3402 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 35 लाख 11 हजार 861 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


महत्त्वाच्या बातम्या :