मुंबई : जगभरातच ओमायक्रॉनच्या संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. राज्यातील ओमायक्रॉन (Omicron) बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी 23 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 6 रुग्ण पुण्यातील, 7 रुग्ण पिंपरी-चिंचवड, मुंबईत 5 , उस्मानाबादेत दोन रुग्ण, ठाणे मनपा, नागपूर मनपा आणि मीरा भाईदर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनच्या 108 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 54 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई विमानतळावर सापडलेल्या नऊ रुग्णांपैकी दोन रुग्ण कर्नाटक आणि केरळ तर प्रत्येकी एक रुग्ण हा छत्तीसगड, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद येथील आहेत. आज सापडलेल्या 23 रुग्णांपैकी 18 रुग्णांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. तर एकाचे लसीकरण झालेले नाही. तर चार रुग्ण लसीकरणासाठी पात्र नाहीत.
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी सात ओमयक्रोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण झाले आहे. यात दोन नेदरलँड, एक साऊथ आफ्रिका, एक दुबई, एक सिंगापूर तर दोन संपर्कात आलेल्यांचा समावेश आहे. यापैकी दुबई, सिंगापूर आणि संपर्कातील दोघे हे एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळं आता शहरातील ओमयक्रोन पॉझिटिव्हची संख्या 19 वर पोहचली असून, दहा जणांनी ओमयक्रॉनवर मात केलेली आहे.
राज्यात शुक्रवारी 1410 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
राज्यात शुक्रवारी 1410 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 868 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 65 लाख 1 हजार 243 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.69 टक्के आहे. राज्यात आज 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 8 हजार 426 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 86 हजार 815 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 886 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 82 , 35, 476 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या :