मुंबई : राज्यात शुक्रवारी ओमायक्रॉनच्या 144 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामधील सर्वाधिक रुग्णसंख्या ही पुणे महापालिका क्षेत्रात नोंद सापडली आहे. पुण्यामध्ये आज 124 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
आज सापडलेल्या रुग्णांपैकी सोलापूरमध्ये 8 तर पुणे ग्रामीणमध्ये 6 रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर परभणी, जळगाव, मुंबई, रायगड, सातारा आणि बीड या जिल्ह्यात प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे.
राज्यात आतापर्यंत एकूण 2343 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1171 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 989 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद ही पुणे शहरात करण्यात आली आहे. तर त्या खालोखाल मुंबईचा क्रमांक लागत असून त्या ठिकाणी 688 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत 5674 लोकांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 74 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
राज्यातील स्थिती
गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 48 हजार 270 नव्या रुग्णांची भर पडली असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 42, 391 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात आज 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.91 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 09 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.47 टक्के आहे. सध्या राज्यात 23 लाख 87 हजार 593 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3357 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 29 लाख 51 हजार 593 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Maharashtra Corona Update : राज्यात गुरूवारी 48 हजार 270 नव्या रुग्णांची भर तर 52 रुग्णांचा मृत्यू
- Mumbai Corona Update : मुंबईत शुक्रवारी 5,008 कोरोना रुग्णांची नोंद तर 12 जणांचा मृत्यू
- शाळांपाठोपाठ आता राज्यातली महाविद्यालयेही सुरु होण्याची शक्यता, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव