N D Patil : आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक संघर्षशील आणि विवेकी नेतृत्व ठरलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांच्या आयुष्यावर राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना रोख रकमेसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र मिळविण्याची संधी. लेट्स रिड इंडीया कडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रा. एन. डी. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्य कर्तृत्वाचा सर्वसामन्यांना परीचय व्हावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रुपये 10 हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र हे प्रथम पारितोषिक, रोख रुपये 5 हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे द्वितीय पारितोषिक, तर रोख रुपये 3 हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे तृतीय  पारितोषिक प्रदान करण्यात येतील. तर काही उत्तेजनार्थ पारितोषिकेही प्रदान करण्यात येतील. 

Continues below advertisement


महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत, तसेच विविध लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांचा बुलंद आवाज बनलेले प्रा. एन. डी. पाटील अखेरपर्यंत राज्यातील सर्वसामान्य, कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले प्रा. एन. डी. पाटील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणूनही उत्तम काम केले होते. नुकताच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहताना त्यांचे पुण्यस्मरण व्हावे यासाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. 


 स्पर्धेचे नियम व अटी
1.निबंधामध्ये शुद्धलेखनाच्या चुका नसाव्यात. 
2. निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये असावा. 
3. निबंधाचे परिक्षण नामवंत अभ्यासक तसेच तज्ञपरिक्षकांमार्फत केले जाईल. 
4.स्पर्धेतील निवडक निबंध पुस्तक रुपात छापले जातील. 
5. परीक्षकांचा व आयोजकांचा निर्णय अंतिम असेल. 
6. निबंधाचा मजकुर हा स्वरचित असावा. कॉपी केलेला किंवा कोणत्या लेखाचा काही भाग घेतल्याचे लक्षात आल्यास प्रवेशिका बाद केली जाईल. 
7. निबंध लेखन स्पर्धेसाठी किमान शब्द मर्यादा १००० ते कमाल २५०० शब्द एवढी निश्चित करण्यात आली आहे. 


भाग घेण्याची अंतिम तारीख 
स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख ५ फेब्रुवारी २०२२ असून स्पर्धकाने निबंधासोबत आपली संपूर्ण माहिती पाठवावी. तसेच स्पर्धेमध्ये खालीलपैकी  कोणत्याही मार्गाने सहभागी होऊ शकता. 


निबंध कसे पाठवणार ?
आपण आपले निबंध लिहून स्कॅन करून  किंवा टाईप करून वर्ड किंवा पीडीएफ फाईल स्वरूपात तयार करून letsreadf@gmail.com या ई-मेल द्वारे पाठवावेत. 


Google फॉर्म द्वारे तुम्ही स्पर्धेत सहभागी होऊ शकता. 
लिंक - निबंध स्पर्धा : विषय : जेष्ठ नेते प्रा. एन डी पाटील 


यासोबतच आपला निबंध लिहून पोस्टाने देखील पाठवू शकता 
पत्ता
311, द ग्रेट ईस्टर्न गॅलरीया, प्लॉट नं. 20, सेक्टर 4, ऑफ पाम बीच रोड, नेरुळ पश्चिम, नवी मुंबई 400 706. फोन 022 27710642