मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  48 हजार 270  नव्या रुग्णांची भर पडली असून 52 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 42, 391 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  काल राज्यात कोरोनाच्या  46 हजार  197 रुग्णांची नोंद झाली होती म्हणजे आज  दोन हजार रुग्णांची वाढ झाली आहे. 
 
राज्यात आज 144 ओमायक्रॉनबाधितांची नोंद 


राज्यात आज  144 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  आतापर्यंत 2343 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1171 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज 52 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज 52 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.91 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 09 हजार 823 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.47 टक्के आहे.  सध्या राज्यात 23 लाख 87 हजार 593 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3357 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 29 लाख 51 हजार 593  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


शुक्रवारी मुंबईत 5,008 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली


शुक्रवारी मुंबईत 5,008 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 12 हजार 913 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील २४ तासांत मुंबईत 12 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.  सध्या मुंबईतील 29 इमारती सील करण्यात आल्या आहेत. तसंच आज नव्याने सापडलेल्या 5,008 रुग्णांपैकी 420 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 4,207 रुग्णांमध्ये कोणताही लक्षणेही नाहीत.  37 हजार 801 बेड्सपैकी केवळ 4,571 बेड वापरात आहेत.  सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 97 टक्के इतका आहे.


इतर बातम्या : 
Mumbai School : मुंबईत सोमवारपासून नाही तर 'या' तारखेपासून सुरु होणार शाळा
Mumbai Local Mega Block : ठाणे-दिवा दरम्यान शेवटचे 2 मेगाब्लॉक, नंतरच पाचवी सहावी मार्गिका सुरू, मध्य रेल्वेची माहिती
Mumbai–Pune Expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरुन दररोज दहा हजारापेक्षा जास्त वाहने टोल न देता करतात प्रवास, माहिती आयुक्तांच्या आदेशावरुन प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत MSRDC चा दावा