मुंबई :  श्रीधर पाटणकरांच्या (shridhar patankar) कंपनीला विनातारण कर्ज देणारे  नंदकिशोर चतुर्वेदी (Who is Nandkishore Chaturvedi)  जवळपास दोन डझनहून अधिक कंपन्यांमध्ये संचालक म्हणून काम करत असल्याचं समोर येतंय. यातल्या बहुतेक कंपन्या शेल कंपन्या असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे मुंबईतल्या एकाच पत्त्यावर चतुर्वेदीच्या 19 कंपन्या रजिस्टर्ड आहेत. त्यामुळे श्रीधर पाटणकरांच्या कंपनीला विनातारण कर्ज देणारे नंदकिशोर चतुर्वेदी नेमके कोण आहेत? ते नेमकं काय करतात?   हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.


नंदकिशोर चतुर्वेदी कोण आहेत?



  • नंदकिशोर चतुर्वेदी  पेशाने सीए आहे. मात्र कोणतीही सीए फर्म चालवत नाहीत.

  •  ईडी  आणि आयकर विभागाच्या सूत्रांनुसार नंदकिशोर चतुर्वेदी  शेल कंपनी ऑपरेट आहेत.

  •  नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या एकाच पत्त्यावर दहापेक्षा अधिक शेल कंपन्यांची नोंदणी आहे.

  • मुंबई, कोलकाता आणि दिल्लीमध्ये विविध ठिकाणी शेल कंपन्यांची स्थापना केली. 

  • या शेल कंपन्यांच्या माध्यमातून  15 ते 20 वर्षांपासून काळा पैसा पांढरा करण्याचं काम करतात. 

  • चतुर्वेदी यांच्या बीकेसीतील  एका भूखंडाच्या व्यवहाराची ईडी आणि आयकर विभागाकडून चौकशी सुरु आहे. 

  • मार्च 2021 पासून ईडी आणि आयकर विभागाकडून चतुर्वेदी यांची चौकशी सुरु आहे. 

  • चतुर्वेदी मे 2021 पासून  आफ्रिकेच्या एका देशात वास्तव्यास असल्याची  सूत्रांची माहिती आहे.

  •  ईडीच्या सूत्रांनुसार नंदकिशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकर 2009 पासून एकमेकांना ओळखतात



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला हवा : नितेश राणे


नंदकिशोर चतुर्वेदी बाबत मी गेल्यावर्षी पासून बोलत आहे. तो कुठे आहे हे समोर आले पाहिजे. मी गेल्यावर्षी पासून ट्विट करत आहे. यात फक्त मुख्यमंत्री यांचा मेहुणाच आहे का?  असा सवाल नितेश राणेंनी केला आहे. नितेश राणे पुढे म्हणाले,  1999 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतला. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत त्यांच्या मेहुण्यावर कारवाई झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला हवा.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha