दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. आजपासून दहावीच्या परीक्षा, सोळा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी, गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकं तैनात
Maharashtra SSC Exams 2022 : राज्यात आजपासून दहावी बोर्डाची परीक्षा (SSC Board) सुरू होत आहे. कोरोनामुळे दोन वर्षांनंतर दहावीची ऑफलाईन परीक्षा सुरु होणार आहे. 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थी दहावी बोर्डाची परीक्षा देणार आहेत. दरम्यान, दहावीच्या परीक्षार्थिंना वेळ वाढवून देण्यात आला आहे. दहावीच्या लेखी परीक्षेत 70 ते 100 गुणांच्या पेपरसाठी 30 मिनिटं तर 40 ते 60 गुणांच्या पेपरसाठी 15 मिनिटं वाढवून देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (Maharashtra State Board Of Secondary & Higher Secondary Education) वतीने घेण्यात येणाऱ्या मार्च एप्रिल 2022 दहावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. मागील वर्षी कोरोनाच्या परिस्थितीत दहावी परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली होती. त्यामुळे दोन वर्षानंतर दहावी परीक्षा घेतली जात आहे. यंदाच्या दहावी बोर्ड परीक्षेला 16,39,172 विद्यार्थी बसणार आहेत. दहावी बोर्ड परीक्षेसाठी एकूण 22,911 शाळांमधील विद्यार्थ्यांनी अर्ज भरले असून राज्यातील 21,284 परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे. आज पहिला पेपर हा प्रथम भाषेचा असणार आहे.
2. फडणवीसांनी उघडकीस आणलेल्या स्टिंग प्रकरणाचा तपास सीआयडीकडे, गृहमंत्री वळसे पाटलांची विधानसभेत घोषणा, सरकारी वकील प्रवीण चव्हाणांचाही राजीनामा
3. विधानसभेत देवेंद्र फडणवीसांकडून आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब, वक्फ बोर्डाच्या सदस्यांचा दाऊदशी संबंध असल्याचा आरोप, सदस्यांची नियुक्ती फडणवीसांनीच केल्याचा नवाब मलिकांच्या मुलीचा पलटवार
4. पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच 7 हजार 231 पदांची पोलीस भरती, गृहमंत्र्यांची माहिती
5. किरकोळ महागाई आठ महिन्यांच्या उच्चांकावर, महागाईचा दर 6.01 टक्क्यांवरुन 6.07 टक्क्यांवर, तर घाऊक महागाईतही वाढ
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 15 मार्च 2022 : मंगळवार
6. मॅगी महागली, 70 ग्रॅमच्या पाकिटाच्या किंमतीमध्ये दोन रुपयांनी वाढ, तर 40 ग्रॅमच्या पाकिटाच्या किमतीत तीन रुपयांनी वाढ
7. हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज सुनावणी, अनेक जिल्ह्यात कलम 144 लागू
हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे कर्नाटक राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. तसेच राज्यात आज शाळा, महाविद्यालये बंद राहणार आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रितू राज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठ आज सकाळी हिजाबच्या मुद्द्याबाबत निकाल देणार आहे.
न्यायमूर्ती कृष्णा एस दीक्षित आणि न्यायमूर्ती खाजी जयाबुन्नेसा मोहिउद्दीन यांचा समावेश असलेल्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने युक्तिवाद ऐकल्यानंतर हे प्रकरण निकालासाठी राखून ठेवले होते. उडुपी प्री-युनिव्हर्सिटी कॉलेज फॉर गर्ल्सच्या सहा विद्यार्थिनींनी हिजाब घालून वर्गात प्रवेश केला होता. त्यानंतर विरोध सुरु केला होता. हा विरोध इतर जिल्ह्यांमध्ये पसरला आणि मोठा वाद निर्माण झाला. काही हिंदू विद्यार्थी भगवी शाल घालून येऊ लागल्याने तणाव निर्माण झाला होता.
8. आज भाजपच्या संसदीय दलाची दिल्लीत महत्त्वाची बैठक, पंतप्रधान मोदीं, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार
9. सलग विसाव्या दिवशीही रशिया-युक्रेन युद्ध सुरुच, आत्तापर्यंत सतराशे जणांचा मृत्यू, तर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आज संसदेत निवेदन देणार
10. बंगळुरु कसोटीत टीम इंडियाकडून श्रीलंकेचा 238 धावांनी धुव्वा; दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताचं 2-0 असं निर्भेळ यश, रोहित शर्माच्या नेतृत्त्वाची प्रशंसा