दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांवर काळाचा घाला, चौघांचा मृत्यू, सहा जखमी तर शेगावला दर्शनासाठी निघालेल्या पाच जणांचाही अपघाती मृत्यू


2. बदली घोटाळा लीक प्रकरणी आरोप-प्रत्यारोपानंतर आज विधीमंडळात सामना, पेनड्राईव्हप्रकरणी फडणवीसांच्या आरोपांवर आज गृहमंत्री उत्तर देणार


3. गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याचा अनिल देशमुख आणि खडसेंचाच कट, प्रवीण चव्हाण यांच्या स्टिंग ऑपरेशनचा आरोप असलेल्या तेजस मोरेंचा दावा तर खडसेंचं मात्र नो कमेंट्स


4. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या भवितव्याचा आज फैसला, देशमुखांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्ट आज फैसला सुनावणार.


5. पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता, तापमान 40 अंशांपार जाण्याचा अंदाज


मार्च महिन्याच्या मध्यातच अंगाची काहिली होण्याची चिन्हं आहेत. कारण पुढील दोन दिवसात मुंबईसह राज्यातल्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. मुंबईसह, पालघर, रायगड, ठाण्यातही  तापमान 42 अंशांपार जाण्याचा अंदाज  आहे. सध्या सौराष्ट्र, कच्छ परिसरात कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे. शिवाय उत्तर कोकणात जमिनीलगत वाहणाऱ्या उष्ण-कोरड्या वाऱ्यांमुळे पुढील 48 तासांत मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात ही अवस्था असेल तर एप्रिल आणि मे महिन्याची कल्पनाच न केलेली बरी.


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 14 मार्च 2022 : सोमवार : एबीपी माझा



6. डिलिव्हरी बॉईजसाठी चारित्र्य पडताळणी आवश्यक, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडेंचे आदेश, वाहतुकीचे नियम मोडल्यास कंपनीवर कारवाई होणार


झटपट डिलिव्हरी (Delivery Boy) करण्यासाठी अनेकवेळा डिलिव्हरी बॉयकडून वाहतूक नियम मोडले जातात. ऑनलाइन मागविण्यात आलेले खाद्यपदार्थ लवकरात लवकर पोहोचविण्यासाठी स्विगी (Swiggy), झोमॅटो (Zomato), डॉमिनोज पिझ्झा (Domino's Pizza) तसेच इतर कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉयमध्ये स्पर्धा लागलेली आहे. उशीर टाळण्यासाठी आणि अधिकाधिक ठिकाणी डिलिव्हरी करता यावी यासाठी डिलिव्हरी बॉय प्रचंड घाईत गाडी चालवतात. प्रत्येक डिलिव्हरीसाठी कंपनीकडून कमिशन दिले जात असल्याने अधिक कमाई करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यामुळे अनेकवेळा ते नो एंट्रीमध्ये ही गाडी टाकतात. यामुळे अनेकवेळा अपघात होण्याची शक्यात असते. डिलिव्हरी बॉयच्या या बेशिस्त वागणुकीला मुंबईतील अनेक नागरिक वैतागले आहेत. मात्र आता या बेशिस्त डिलिव्हरी बॉयना शिस्त लावण्यासाठी स्वतः मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे (Mumbai Police Commissioner Sanjay Pandey) हे मैदानात उतरले आहेत.    


रविवारी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुक लाईव्ह करत मुंबईकरांशी संवाद साधला. यावेळी संवाद साधताना त्यांनी मुंबईच्या अनेक मुद्द्यांवरून भाष्य केलं आहे. यातीलच एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ट्राफिक आणि मुंबईत बेशिस्तपणे गाडी चालवणारे डिलिव्हरी बॉय. मुंबई पोलीस आयुक्तांनी यावेळी फेसबुक लाईव्हवरून संवाद साधताना डिलिव्हरी बॉयना आणि त्याशी संबंधित कंपन्यांना इशारा दिला आहे.   


7. काँग्रेसचं नेतृत्व तूर्त सोनिया गांधींकडेच, कार्यकारिणीच्या चिंतन बैठक एकमत, राहुल गांधींकडे धुरा सोपवण्याची काँग्रेस नेत्यांची मागणी


8. मध्य प्रदेशाच्या नव्या दारू धोरणाविरोधात भाजप नेत्या उमा भारती आक्रमक, भोपाळमध्ये उमा भारतींकडून दारू दुकानाची तोडफोड


9. रशिया युक्रेन युद्धाचा 19वा दिवस, दोन्ही देशांमध्ये आज पुन्हा चर्चा होणार, तोडगा निघणार का? याकडे संपूर्ण जगाचं लक्ष 


10. बंगळुरु कसोटीत श्रीलंकेसमोर 447 धावांचं आव्हान, भारताचा दुसरा डाव 303 धावांवर घोषित, आजचच निकालाची शक्यता