दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. गिरीश महाजनांवर मोक्का लावण्यासाठी षडयंत्र रचल्याचा आरोप, विधानसभेत फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब, चाकू प्लँट करण्यापासून गळ्याला रक्त लावण्यापर्यंतचा प्लॅन केल्याचा दावा


2. फडणवीसांच्या आरोपांवर गृहमंत्री काय उत्तर देणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष, तर व्हिडीओमधला आवाज माझा नाही, आरोपांच्या केंद्रस्थानी असलेले सरकारी वकील प्रवीण चव्हाणांची प्रतिक्रिया


3. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आज भाजपचा मोर्चा, फडणवीसांसह प्रमुख नेते मोर्चात सहभागी होणार, तर मलिकांच्या जामिनावर उच्च न्यायालयात सुनावणी


4. अनिल परब आणि आदित्य ठाकरेंची निकटवर्तीय आयकरच्या रडारवर, परबांच्या सीएसह परिवहन अधिकाऱ्याच्या घरी छापे तर राहुल कनाल यांच्या घरीही धाड


5. मुंबईत ईडीच्या अधिकाऱ्यांकडून वसुली रॅकेट, संजय राऊतांचा आरोप तर सोमय्या पितापुत्रा जेलमध्ये जाणारच, राऊतांकडून पुनरुच्चार


पाहा व्हिडीओ :  स्मार्ट बुलेटिन : 09 मार्च 2022 : बुधवार



6. सत्तावीस मार्चपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा पूर्ण क्षमतेनं सुरु होणार, कोरोनाचा प्रादुर्भाव  घटल्यानं केंद्र सरकारचा निर्णय


7. ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांवर अवकाळीचं संकट, नंदुरबारसह धुळे जिल्ह्यात गारपीट, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याला अलर्ट


Weather News : दिल्लीसह उत्तर भारतात हवामानात बदल होत आहे. उत्तर भारतातील काही भाग सोडला तर अन्य भागात तापमान सामान्य राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरसह राजस्थानमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच दुसरीकडे, आज महाराष्ट्रात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. 


हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरामतमध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. 


8. लाल मिरचीच्या दरात 50 ते 100 रूपयांची वाढ,  एपीएमसी मार्केटमध्ये आवक घटली, अवकाळी पावसाचा फटका


9. जम्मू काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या चार दहशतवाद्यांना अटक, मोठा शस्त्रसाठा जप्त


10. रशियाकडून इंधन खरेदी न करण्याचा अमेरिकेचा निर्णय, तर सुमीत अडकलेल्या 700 भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा