Weather News : दिल्लीसह उत्तर भारतात हवामानात बदल होत आहे. उत्तर भारतातील काही भाग सोडला तर अन्य भागात तापमान सामान्य राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरसह राजस्थानमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच दुसरीकडे, आज महाराष्ट्रात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी गारपीटीचा इशारा देखील देण्यात आला आहे. 


हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरामतमध्ये पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. 


काश्मीरमध्ये पावसासह बर्फवृष्टी


देशातील इतर राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, जम्मू-काश्मीरमध्ये आज मुसळधार  पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.  तसेच 10 मार्चला हवामान स्वच्छ राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. दुसरीकडे तापमानात हळूहळू वाढ होत असल्यानं हवामानात बदल होत आहे. तसेच काही ठिकाणी अद्याप थंडीही जाणवत आहे.


राजस्थान


राजस्थानमध्ये देखील जोरदार पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार,  8 ते 10 मार्चदरम्यान महाराष्ट्र, गुजरात प्रदेश, पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात गडगडाट होण्याची शक्यता वर्तवली आहे.


बिहार


बिहारमध्ये देखील हवामान बदलत आहे. गेल्या 24 तासात राज्याच्या हवामानाबाबत बोलायचे झाले तर तिकडे कोरडे वारे वाहत आहेत. त्याचबरोबर पुढील पाच दिवस राज्यात हवामान कोरडे राहिल्याने रात्रीच्या तापमानात विशेष बदल होणार नाही. कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याची शक्यता आहे.



उत्तराखंड


आज उत्तराखंडमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये हवामान स्वच्छ राहील, तसेच सूर्यप्रकाशही राहणार आहे. आज राज्याच्या बहुतांश भागात किमान तापमान 6 अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या: