दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा, ओबीसी राजकीय आरक्षणावर विशेष विधेयक मांडलं जाणार, विधेयकाचा मसुदा मध्य प्रदेशच्या फॉर्म्युल्यावर
2. मुंबई महापालिकेची मुदत आज संपणार, निवडणुका जाहीर न झाल्याने प्रशासक बसणार तर शेवटच्या स्थायी समिती बैठकीत अनेक प्रस्ताव मंजुरीसाठी येणार
3. पिंपरी चिंचवडमध्ये फडणवीसांच्या गाडीवर चप्पल भिरकावली. तर विकासकामांचं उद्घाटन सुरु असताना भाजप-राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
4. नारायण राणेंची अडचण वाढण्याची शक्यता, मुंबई महापालिकेकडून नारायण राणेंना जुहूतील अधीश बंगल्याच्या बांधकामाबाबत नोटीस, बंगल्याचं बांधकाम अनधिकृत असल्याचा पालिकेकडून ठपका
5. पोलीस बाजूला हटवले असते तर नवाब मलिकांच्या कानाखाली मारली असती, नितेश राणेंचं वादग्रस्त विधान, तर बाळासाहेबांनंतरचे खरे हिंदुहृदयसम्राट देवेंद्र फडणवीसच असल्याचा दावा
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 07 मार्च 2022 : सोमवार
6. आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांच्या मुंबईतील शासकीय बंगल्याबाहेर आंदोलन, वनजमिनी संदर्भात कायदेशीर निर्णय घेण्याची मागणी, मागे हटणार नसल्याचा आंदोलकांचा पवित्रा
राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु झाला आहे. नवाब मलिक, ओबीसी आरक्षणासह अन्य काही मुद्दे गाजण्याची शक्यता आहे. आज ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन आज विधिमंडळात विधेयक मांडणार आहे. याबाबतची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली होती.
दरम्यान, 11 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी केली आहे. तसेच, सत्ताधारीही विरोधकांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहेत. याचा प्रत्यय अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये दिसून आलाच आहे.
7. उत्तरप्रदेशच्या प्रयागराजनंतर नागपुरातही लवकरच हवेतून धावणारी केबल बस, गडकरींचे सूतोवाच, डीपीआर तयार करण्याचे निर्देश
8. उत्तर प्रदेशात शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान, पूर्वांचलच्या 9 जिल्ह्यांमधील 54 जागांवर मतदार बजावणार मतदानाचा हक्क, 10 मार्चच्या मतमोजणीकडे नजरा
9. रशिया आणि युक्रेन युद्ध बाराव्या दिवशीही धगधगतंच, युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर 139 डॉलर्सवर, आता तिसऱ्या फेरीतील चर्चेकडे जगाचं लक्ष
शिया-युक्रेन युद्धामुळं (Russia-Ukraine War) जगाची चिंता वाढली आहे. अशातच दोन देशांतील युद्धामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. ब्रेंट क्रूड ऑईलची किंमत 139 डॉलर्स प्रति बॅरलवर पोहोचली आहे.
10. मोहालीत टीम इंडियाकडून श्रीलंकेचा धुव्वा, भारताचा एक डाव 222 धावांनी विजय, रवींद्र जाडेजाची अष्टपैलू कामगिरी