दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.


1. युद्ध थांबवण्यासाठी मोदींनी पुतिन यांच्याशी चर्चा करावी, युक्रेनची विनंती, तर डोनेटस्क ताब्यात दिल्यास युद्ध थांबवू, रशियाचा पवित्र
 
2.मुख्यमंत्र्यांनी फोन करुन वक्तव्य न करण्याची ताकीद दिली, नारायण राणेंचा दावा, दिशा सॅलियनबाबत वक्तव्याप्रकरणी राणे पिता-पुत्रांची मुंबई पोलिसांकडून ९ तास चौकशी


3. पुणे मेट्रोसह वेगवेगळ्या विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान पुणे दौऱ्यावर, मेट्रोचं काम अर्धवट राहिल्याचा दावा करत पवारांचा टोला, काँग्रेस-राष्ट्रवादी आंदोलनाच्या पवित्र्यात


4. नंदिला दूध पाजण्यासाठी मंदिराबाहेर अनेकांच्या रांगा, मध्यप्रदेशातल्या अफवांचं पेव महाराष्ट्रात, अंनिसकडून प्रात्यक्षिकासह दाव्याचं खंडन


5. नवीन पोलीस आयुक्त संजय पांडेंचं मुंबईकरांना गिफ्ट, नो पार्किंग झोनमधील गाड्या तूर्तास टो न करण्याचा निर्णय, मुंबईकरांनी नियम पाळले तरच दिलासा कायम ठेवणार


6. उत्तर भारतात ढगाळ वातावरण, तर 7 ते 9 मार्चदरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता


7. बीडमधील जलयुक्त शिवार योजनेतील घोटाळ्याचा फेरतपास करण्याचे आदेश, पोलिसांचा सी समरी अहवाल न्यायालयाने फेटाळला 


8. राज्यात शनिवारी 535 कोरोनाबाधितांची नोंद 963  रुग्ण कोरोनामुक्त, 10 रुग्णांचा मृत्यू


9. पराग आणि अमूलनंतर आता मदर डेअरीनेही केली दूध दरात वाढ,  लिटरमागे दोन रुपयांची वाढ, आजपासून नवीन दर लागू  


Mother Dairy Milk Price : दिल्ली एनसीआरमध्ये आजपासून दूध महाग झाले आहे. पराग (Parag) आणि अमूलच्या (Amul) दरात वाढ झाल्यानंतर आता मदर डेअरीनेही (Mother Dairy) दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची वाढ केली आहे. आजपासून नवीन दर लागू करण्यात आले आहेत. आता मदर डेअरीतून एक लिटर दूध घेण्यासाठी दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. काही दिवसांपूर्वी अमूल आणि परागने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांची वाढ केली होती. 


कोणते दूध किती दराने मिळणार?


मदर डेअरी दुधाची दिल्ली-एनसीआरमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होते. दररोज 30 लाख लिटरहून अधिक दूध विकले जाते. मदर डेअरीचे टोकनाइज्ड दूध, जे आधी 44 रुपये लिटरने मिळत होते, ते आता 46 रुपयांना लिटर मिळत आहे. अर्धा लिटर अल्ट्रा प्रीमियम दूध पूर्वी 31 रुपयांना मिळत होते, आजपासून ते 32 रुपयांना मिळत आहे. आधी 57 रुपयांना मिळणारे 1 लिटर फुल क्रीम दूध आता 59 रुपयांना मिळत आहे. पूर्वी 47 रुपये लिटरला मिळणारे टोन्ड दूध आता 49 रुपयांना मिळत आहे. दुहेरी टोन्ड दूध, जे आधी 41 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध होते, ते आता 43 रुपये प्रति लिटरने उपलब्ध आहे. पूर्वी 49 रुपये लिटरने मिळणारे गायीचे दूध आता 51 रुपयांना मिळत आहे.


10. महिला क्रिकेट विश्वचषकाच्या सलामी सामन्यात भारताचा पाकिस्तानशी मुकाबला, नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय