सोलापूर : अर्धनग्न अवस्थेत अश्लील आणि बीभत्स डान्स सुरु असलेल्या डान्सबारवर सोलापूरच्या गुन्हे शाखेचे छापा टाकत कारवाई केली आहे. सोलापूर शहरातील हॉटेल पॅराडाईज येथे अश्लील नृत्य सुरु असून काही जण चलनी नोटांची उधळण करत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्यासह गुन्हे शाखेच्या पथकाने हॉटेल पॅराडाईजवर छापा टाकला. यावेळी स्टेजवर 8 नृत्यांगना अर्धनग्न अवस्थेत अश्लील हावभाव करत बीभत्स डान्स करत होत्या. तर काहीजण हे त्यांच्यावर चलनी नोटांची उधळण करत होते. 


सोलापूर शहरात कोरोनाची स्थितीनुसार मनोरंजन कार्यक्रमास केवळ 50 टक्के मर्यादेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र हॉटेल पॅराडाईज येथे क्षमतेपेक्षा जास्त लोकांना प्रवेश दिल्याने कोरोनाच्या नियमांचे देखील उल्लंघन होत होते. तसेच ऑर्केस्ट्रा बारमधील ग्राहकांना विनापरवाना मद्य पुरवल्याचे देखील पोलिसांच्या लक्षात आले. 


हॉटेलचा मालक बाबा जाफर हा त्याचा हस्तक संजय पोळ आणि मॅनेजर मुकेशसिंग बायस यांच्यामार्फत हॉटेल पॅराडाईज चालवत होता. त्यामुळे यांच्यासह एकूण 29 इसम आणि 8 नृत्यांगना याना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच या प्रकरणी तब्बल 48 लाख 98 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त केला आहे. 


याप्रकरणी संजय पोळ (वय 41), मुकेशसिंग बायस (वय 47), अजिंक्य अशोक देशमुख (वय 30), मयूर लक्ष्मण पवार (वय 35), विजय शिवशंकर तिवारी (वय 47), विशाल राजेंद्र कोळी (वय 26), नितीन अप्पासाहेब सासणे (वय 34), गोपाळ बाबू जाधव (वय 48), सुधाकर संदीपान माने (वय 27), श्रीकांत प्रल्हाद शिंदे (वय 22), आकाश गणेश कांबळे (वय 27), मारुती केत (वय 37), रजनीश भोसले (वय 34), सचिन सुरेश जाधव (वय 35), अमर देविदास जमादार (वय 27), आकाश गुरव, दीपक सुंदरसिंग चव्हाण, प्रकाश वाघमारे, पुरुषोत्तम बने, अमिताभ वाघमारे, अजय शिवाजी धजाल, प्रसाद लोंढे, प्रवीणकुमार शिंदे, प्रशांत गायकवाड, प्रभाकर फताटे, राजकुमार उडचान, निसार मुजावर, संतोष कदम, गौस शेख आणि आठ नर्तिका यांच्याविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


सोलापूर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे, सपोनि संजय क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक संदिप शिंदे, निखिल पवार, शैलेश खेडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.