Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 12 जून 2021 | शनिवार | ABP Majha
1. मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग, अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं, तर 13 आणि 14 जूनला मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा
2. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन कोरोनाबाधित जास्त, 8 हजार 104 जणांना डिस्चार्ज तर 11 हजार 766 नव्या रुग्णांची नोंद
3. कोरोना रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यूच्या माहितीची व्याप्ती मोठी, साथरोग सर्वेक्षण यंत्रणेचं काम पारदर्शक, आकडेवारी लपवण्याचा प्रश्नच नाही, आरोग्य विभागाचं स्पष्टीकरण
4. पॉझिटिव्हिटी रेट घसरल्याने मुंबई आणि उपनगर तिसर्या टप्प्यातून दुसर्या टप्प्यात, मात्र अनलॉकच्या नियमांमध्ये कोणताही बदल नाही
5. राज्यातील बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याचा शासन निर्णय जारी, परीक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच जाहीर होणार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
6. मराठा आरक्षण वादात आता नक्षलवाद्यांची उडी, दलालांपासून सावध राहा, मराठा तरुणांना उद्देशून नक्षलवाद्यांचं पत्रक
7. माळशेज घाटात उभ्या असलेल्या कारवर दरड कोसळली, चहा पिण्यासाठी उतरल्याने दोन जण थोडक्यात बचावले, कारचा चक्काचूर
8. केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत, रात्री उशिरापर्यंत नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यात खलबतं, मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा
9. भाजप नेते मुकुल रॉय यांची चार वर्षांनी घरवापसी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
10. नोवाक ज्योकोविचची 'क्ले कोर्ट'च्या राजावर मात, राफेल नदालला पराभूत करुन फ्रेन्च ओपनच्या फायनलमध्ये, नदाल पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये पराभूत