पुणे : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाल्यानंतर  विरोधकांच्या एकजुटीला प्रभावी चेहरा म्हणून शरद पवारांच्या  नाव समोर येत आहे. या विषयी शरद पवारांचे नातू आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले,  यूपीएचे अध्यक्षपद शरद पवारांनी भूषवले असं अनेकांना वाटतं. 


रोहित पवार यांनी आज पुण्यात एका पावभाजीच्या गाड्याचे उद्घाटन केलं. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. उद्धाटन केल्यानंतर  रोहित पवार यांनी स्वतः कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भाजी बनवली. उपस्थित कार्यकर्त्यांना वाटप केली. कार्यकर्त्यांनीही आपल्या नेत्याने केलेल्या पावभाजी चा आस्वाद घेत त्यांना मनापासून दाद दिली. 


शरद पवार म्हणाले,  शरद पवार  अनेक तरुणांना आपलेसे वाटतात. यूपीएच अध्यक्षपद त्यांनी भूषवावे असं अनेकांना वाटतं.  परंतु यूपीएतील घटक पक्षातील वरिष्ठ नेते याबाबतीत अंतिम निर्णय घेत घेतील.


नाराज आमदाराला आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला भेटण्याचा अधिकार


नाराज काँग्रेस आमदारांविषयी बोलताना रोहित पवार म्हणाले,  काँग्रेसच्या काही युवा आमदारांना विधानसभेत त्यांचे विषय मांडता आले नाही. कारण विरोधी पक्ष सातत्याने गोंधळ घालत होते. त्यामुळे अनेकदा सभागृहाचं कामकाज तहकूब करावे लागले. त्यामुळे या आमदारांना वेळ देता आला नाही त्यामुळेहे आमदार नाराज आहेत.  कुठल्याही पक्षाचा आमदाराला आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला भेटण्याचा आणि आपल्या अडचणी सांगण्याचा अधिकार आहे.


खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे योग्य नाही


सदाभाऊ खोत यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा विषय बोलताना ते म्हणाले,  अशाप्रकारे खालच्या पातळीला जाऊन टीका करणे योग्य नाही. 


भाजप विरोधात बोलणाऱ्यांवर कारवाई होते


नागपुरातील वकील उके यांच्यावर आज सकाळी इडीने केलेल्या कारवाईबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले,  जे कोणी भाजपविरोधात बोलत असतात त्यांच्यावर कारवाई होत असते. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha